प्रा.हनुमंतराव पवार लिखित स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते या पुस्तकाचा पुण्यात होणार प्रकाशन सोहळा..!
पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील निमगाव(म) येथील प्रा.हनुमंतराव पवार यांनी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव यांच्या जीवनावर एक पुस्तक लिहिले असून सदरच्या पुस्तकाचा गुरुवार दिनांक 12 मे रोजी सकाळी 10:30 वाजता पुणे येथील गांजवे चौकातील पत्रकार भवन येथे प्रकाशन सोहळ्याचे आयोजन केले असल्याचे प्रा.हनुमंत पवार यांनी सांगितले.89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते खेडचे आमदार दिलीपराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते- उद्योजक किरण जाधव,तळवीडचे सरपंच जयवंतराव मोहिते,कुस्ती निर्णायक पै.रावसाहेब मगर इत्यादी मान्यवरांची या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती राहणार असून संस्कृती प्रकाशनाच्या कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार.डॉ.दिलीप पवार.सुदाम शिंदे, ब्रह्मदेव मगर(सर) यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होणार असल्याचे प्रा. हनुमंतराव पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.