जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त पिलीवसह परिसरातील एकूण 82 रक्तदात्यांनी केले रक्तदान..!
पिलीव/प्रतिनिधी
रक्तदान श्रेष्ठदान,रक्तदान कार्य महान हा हेतू डोळ्यासमोर ठेवून पिलीव येथील समस्त वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने विश्वगुरू जगज्योती महात्माबसवेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे आज शनिवार दिनांक 7 मे रोजी भव्य आश्या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

रक्तदान शिबिरामध्ये पिलीवसह परिसरातील एकूण 82 रक्तदात्यांनी रक्तदान करून महात्मा बसवेश्वर महाराज यांना अभिवादन केले.सदरच्या रक्तदान शिबिरास परिसरातील लोकांनी सहकार्य केल्याबद्दल लिंगायत समाजाचे नवनिर्वाचित अध्यक्ष शुभजित नष्टे यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले.कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी उपसरपंच संजय आर्वे,माजी उपसरपंच नानासाहेब देशमुख,ग्रा.पं.सदस्य अविनाश जेऊरकर,उमेश देशमुख,डाॅ.तुषार गुळभिले,सुरेश घोंगडे,कैलास घोंगडे, योगेश देशमुख,उपाध्यक्ष ऋषिकेश देशमुख,सुरेश घोंगडे,अतुल नष्टे,कल्याण नष्टे ,गणेश देशमुख,महादेव शेटे,नागन्नाथ स्वामी महाराज,निलेश घोंगडे,विनायक आर्वे, यांचा मोलाचा वाटा असल्याचे नष्टे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.