आ.रणजीतसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मा.श्री.धैर्यशील मोहिते-पाटील यांचा सामाजिक जाणिवेचा स्तुत्य उपक्रम : डाॅटर मॉम्स फाऊंडेशन प्रायोजित सायकल बँक…!
पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील जिल्हा परीषद व खाजगी शाळामधील सुमारे साडे सहा हजार मुली या शिक्षण घेत आहेत.ज्या मुली शाळे पासुन तीन किलोमीटर हून अधिक दूर आहेत त्या विद्यार्थिनी फक्त दूर वरच्या अंतरामुळे शिक्षणाच्य़ा प्रवाहापासून दूर जातात त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यासाठी सामाजिक जाणिवा जोपासत डाॅटर माॅम्स फाऊंडेशन वतीने मा.आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त सायकल बँक उपक्रमास सुरवात केली जाणार आहे.आम्ही डाॅटर माॅम फाऊंडेशनच्या सायकल बँकेस सुरवातीला ५० सायकल देत आहोत व डाॅटर माॅम फाऊंडेशन या सायकल पंचायत समितीच्या मार्फत जि.प., खाजगी शाळांना वाटप करणार आहे व शाळेंच्या मार्फत इयत्ता पाचवी ते सातवी मधील गरजवंत मुलींना या सायकलींचे वाटप करण्यात येणार आहे.आपणास आवाहन करणेत येते कि आपण देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा देणेसाठी हार, तुरे , बॅनर फटाके इतर बाबीवर खर्च न करता सायकल बँक उपक्रमात सहभागी व्हावे व जिल्हा परीषद शाळामध्ये शिक्षण घेणाऱ्या मुली शाळे पासून दूर राहतात त्यांना राहत्या ठिकाणाहून किंवा प्रशालेतून ये-जा करण्यासाठी त्यांचे मोठ्या प्रमाणात पैसेही खर्च होतात फक्त पैशाविना त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये या करता आपण इतर खर्चाला फाटा देत सामाजिक भान जपत “सायकल बँक” उपक्रमास रोख आर्थिक रक्कमेच्या माध्यमातून अथवा खाली दिलेल्या संस्थेच्या अधिकृत आकौंटवर रक्कम जमा करून किंवा प्रत्यक्ष सायकल देऊन सहकार्य करावे असे मा.श्री.धैर्यशील मोहिते पाटील यांनी माळशिरस टाईम्सच्या माध्यमातून नम्रतापूर्वक आव्हान केले आहे.
Daughter Moms Group
Bank Name – Bank Of Maharashtra, Akluj
A/C Number-60212120424
IFSC Code : MAHB0000052