पिलीव येथील”जसपालसिंग राजपूत”यांनी मुलाच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून केला नाविन्यापुर्ण असा गावाच्या हिताचा स्तुत्य असा उपक्रम : या अगोदरही सामाजिक उपक्रमास केली आहे भरघोस मदत..!

पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील नामांकित उद्योगपती म्हणून ओळखले जाणारे जसपालसिंग प्रतापसिंग राजपूत यांनी मुलाच्या वाढदिवसानिमित्त डीजे,डॉल्बी,केक,फटाके यांसह इतर अनावश्यक गोष्टींना फाटा देत गावाच्या हितासाठी आपल्या उत्पन्नातील सिंहाचा राहिला पण खारीचा वाटा खर्च करावा या उद्देशाने बाजार पटांगणाच्या नजीक असणाऱ्या व काही दिवसापूर्वीच बांधकाम झालेल्या सिमेंट बंधाऱ्याला गळती लागली असून तो बंधारा लिकेज आहे.

सदर बंधाराच्या शेजारी २०/२२ शेतकरी असून त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे गावाला पाणीपुरवठा करणारी ग्रामपंचायतची वॉटर सप्लायची विहीर आहे.या बंधाऱ्याचे काम व्यवस्थित केले तर गावाच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीला चांगला व सुरळीत पाझर होईल व गावाला मुबलक पाणी मिळेल व त्या परिसरातील शेतकऱ्यांनाही शेतीसाठी मोठा फायदा होईल हा हेतू डोळ्यासमोर ठेवून जसपालसिंग राजपूत यांनी मुलाच्या वाढदिवसाचे औचित साधून या बंधार्याच्या बाजूला आलेली काटेरी झुडपे जेसीबीच्या साह्याने काढणे,बंधारा गळतोय त्याचे लिकेज काढणे व बंधार्याचे खोलीकरण करणे असा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे.सदरच्या कामामुळे जसपालसिंग जनावर यांचे विविध स्तरातून व सोशल मीडियाच्या माध्यमातून कौतुक होत असल्याचे पहावयास मिळत आहे.प्रत्येक गावात एक जसपालसिंग तयार झाला तर गावाच्या वैभवात भर पडण्यासाठी नक्कीच मदत होईल यात तीळ मात्र शंका नाही हे मात्र नक्की..!

मी माझ्या नावासाठी व स्वार्थासाठी कधीच काही केले नाही.मला समाजसेवेचे वेड आहे त्यामुळे पिलीव परिसरातील सामाजिक उपक्रमास वेळोवेळी मदत करत असतो.त्यातून मला खूप समाधान मिळते.
“जसपालसिंग राजपूत”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *