पिलीव येथील सौ.सारिका ज्ञानेश्वर माळी यांची पहिल्याच प्रयत्नात सहाय्यक रासायनिक विश्लेषक पदाला गवसणी : सौ.सारिका यांचे विविध स्तरातून कौतुक व अभिनंदन..!
पिलीव/प्रतिनीधी
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या फॉरेन्सिक डिपार्टमेंट मधील सहाय्यक रासायनिक विश्लेषक या पदाला माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील सारिका ज्ञानेश्वर माळी यांनी पहिल्याच प्रयत्नात गवसणी घातली आहे.सारिका माळी यांचे पहिली ते दहावी शिक्षण आटपाडी तालुक्यातील दिघंची येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले.तर अकरावी/बारावी आटपाडी येथील आबासाहेब खेबूडकर ज्यू.कॉलेज येथे झाले.त्यानंतर BSC एस,पी कॉलेज पुणे येथे झाले. तर MSC सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी मध्ये झाले.सारिका माळी यांचे पती ज्ञानेश्वर दत्तात्रय माळी यांची पिलीव सह सोलापूर,पुणे,मुंबई, तसेच देशभर प्रसिध्द ग्राफिक डिझायनर म्हणून ओळख आहे.तर सारिका यांचे दीर तुषार दत्तात्रय माळी हे मुंबई येथे STI आहेत.सासरे दत्तात्रय माळी हे सेवानिवृत्त एस,टी ड्रायव्हर सासू या अंगणवाडी सेविका त्यामुळे सारिका माळी यांची पिलीव परिसरामध्ये साक्षर व सुशिक्षित कुटुंबाची सून म्हणून ओळख आहे.एखादी व्यक्ती यशस्वी झाली तर त्या व्यक्तीला वारंवार प्रश्न विचारला जातो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एखाद्या स्त्रीचा हात असतो. मी ठामपणे सांगू इच्छिते की माझ्या या यशाच्या मागे माझे पती ज्ञानेश्वर दत्तात्रय माळी यांचे खूप मोठे सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे.असे सारिका यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.सारिका यांच्या उत्तुंग यशाबद्दल पिलीव सह परिसरातील विविध स्तरातून त्यांच्यावर कौतुकासह अभिनंदनाचा वर्षाव होत असल्याचे पहावयास मिळत आहे.