पिलीव येथे भरधाव वेगाने आलेल्या स्कॉर्पिओ गाडीने मोटरसायकलस्वारास उडविले : तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

पिलीव/सुजित सातपुते

आज गुरुवार दिनांक 29 रोजी दुपारी 12 वा.सुमारास पिलीवहून पंढरपूर कडे जाणाऱ्या तरुणास पंढरपूर वरून भरधाव वेगाने येणार्या स्कॉर्पिओ गाडीने विठ्ठलवाडी येथे जोराची धडक दिल्याने तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.सदर प्रकरणाची पिलीव पोलीसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की बाबा बाळू चव्हाण रा.हिंगणी,ता.माण,जि.सातारा हा तरुण आपल्या MH-11CM-0737 या क्रमांकाच्या HF डिलक्स या मोटारसायकलवरुन पंढरपूरला जात असताना पिलीव-पंढरपूर रोडवर विठ्ठलवाडी येथे पंढरपूरहून येणाऱ्या MH-42K-5490 या क्रमांकाच्या स्कॉर्पिओ गाडीने समोरुन जोराची धडक दिल्याने तरुणाचा सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.सदर प्रकरणाची माहिती मिळताच पिलीव औट पोस्टच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व सदर प्रकरणाची चौकशी केली असता अपघातातील स्कार्पिओ गाडी ही विश्वजीत जयसिंग घोरपडे रा.भाडळी,ता.कोरेगाव,जि.सातारा यांची असल्याचे समजले यावेळी पिलीव पोलीसांनी लागलीच घोरपडे यांच्यावर माळशिरस पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद केला असून अपघातातील स्कार्पिओ गाडी जप्त केली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पिलीव औट पोस्टचे हवालदार पंडित मिसाळ हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *