लेखी आश्वासनानंतर सुजित सातपुते यांची उद्या होणार्या आमरण उपोषणास तूर्तास स्थगिती..!
पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व रमेश खालीपे ज्युनिअर या शाळेत प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पाचवी ते बारावी पर्यंत आनुदानित वर्गांमध्ये मोफत प्रवेश मिळावा अन्यथा 30 जून 2023 रोजी सकाळी 9:30 वाजता कर्मवीर शाळेसमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समितीचे माळशिरस तालुका अध्यक्ष सुजित सातपुते यांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजीराव कापसे यांना इशारा दिला होता.परंतु सदर निवेदनाची दखल घेऊन मुख्याध्यापक यांनी सुजित सातपुते यांना लेखी आश्वासन देऊन आम्ही संस्थेकडे पाठपुरावा व विचारविनिमय करून किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन लवकरच आपला प्रश्न मार्गी लावू अशा अशयाचे लेखी पत्र दिल्याने सुजित सातपुते यांनी 30 जून रोजी आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय तूर्तास स्थगित केला असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. गोरगरीब व गरजू किंवा होतकरू विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळावा प्रवेश फी वाचून एखाद्या मुलाचे शिक्षण वाया जाऊ नये,शिक्षणापासून मुले भरकटू नये,आपल्या गावातील शाळा व विद्यार्थी यांची गुणवत्ता टिकून राहावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच मी आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला होता असेही सातपुते यांनी सांगितले.