श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पालखीचे पिलीव नागरित श्री व सौ जेऊरकर दाम्पत्यांनी केले भक्तीमय वातावरणात जंगी स्वागत..!
पिलीव/सुजित सातपुते
“धन्य ते सभाग्य नर आणि नारी ।
करिताती वारी पंढरीची ।।
तयांचे चरण माझे दंडवत ।
जे नेमे माझ्या गात विठोबासी ।।
दिवाळी दसरा अवघे पर्वकाळ ।
नांदती सकळ तया घरी ।।”
गेल्या 51 वर्षा पासून अखंडितपणे विठुरायाच्या भेटीला जाणारी महाराष्ट्रातील एकमेव अशी पालखी आहे की त्या पालखीला चालक-मालक असे कोणीही नाही. ती पालखी म्हणजे श्री क्षेत्र ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची पालखी,सुमारे 4000 पेक्षा ही जास्त वारकर्यांचा या पालखीमध्ये सहभाग असतो.गेली अनेक वर्षांपासून माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील मा. ग्रामपंचायत सदस्य तथा श्रीराम पतसंस्थेचे चेअरमन श्री.अविनाश जेऊरकर व पिलीव ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्या सौ.अनिता जेऊरकर या दांम्पत्यांनी गोंदवलेकर महाराजांच्या पालखीचे पिलीव नगरीत भक्तीमय वातावरणात जंगी स्वागत करून उभ्या रिंगणाची परंपरा आजही कायम ठेवली आहे.दिंडीतील विणेकरी,विठ्ठल रुक्मिणी व वासुदेवाची वेशभूषा केलेल्यांचा,डोक्यावर तुळशी घेऊन चालत असलेल्या महिला वारकऱ्यांचा,माऊलींच्या पालखी साठी आपली बैलजोडी देणाऱ्या शेतकऱ्यांचा श्री व सौ जेऊरकर दाम्पत्यांनी पुष्पवृष्टी करून शाल श्रीफळ देऊन व फटाक्यांची आतषबाजी करत पालखीचे भक्तीमय वातावरणात स्वागत केले.केवळ याचे जेऊरकर दांपत्यामुळे पिलीवमध्ये उभे रिंगण घेण्याची परंपरा सुरू झाली असल्याने पिलीसह परिसरातील ग्रामस्थांकडून श्री व सौ जेऊरकर दांम्पत्यांचे अभिनंदन केले जात आहे.