कु.समृध्दी पंडीत हिने तोडले 67 वर्षांचे रेकॉर्ड : समृद्धीच्या नातेवाईकांकडून वर्ग शिक्षक श्री.अतुल पाटील यांचा यथोचित सन्मान..!
पिलीव/सुजित सातपुते
सर्वच पालकांना त्यांची मुले ज्या शिक्षकांकडे शिकतात त्या शिक्षकांकडून खूप अपेक्षा असतात. जसे आई-वडील मुलांसाठी वेगवेगळ्या भूमिका पार पाडत असतात त्यापद्धतीनेच शिक्षक देखील विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये वर्ग आणि खेळाच्या मैदानात पर्यंत वेगवेगळ्या भूमिका पार पाडत असतात.विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी एखादे आपवाद वगळता प्रत्येक शिक्षक विविध प्रकारचे प्रयत्न करत असतात.

भविष्यामध्ये एक चांगला विद्यार्थी घडावा यासाठी शिक्षक सर्वतोपरी प्रयत्न करतात. विद्यार्थ्यांसह स्वतःच्या जीवनात देखील ठरवलले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ते नेहमी झटत असतात.याचीच प्रचीती दिसून आली आहे ती माळशिरस तालुक्यातील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालतील इयत्ता दहावीचे वर्ग शिक्षक श्री.अतुल पाटील सर यांच्या मध्ये.
याचे झालेय असे कि पिलीव येथील कर्मवीर विद्यालयामध्ये इयत्ता दहावीमध्ये शिकत असलेली कु.समृद्धी मनोज पंडीत ही मुळची उस्मानाबादची परंतु पिलीव हे तिच्या मामाचे गाव तिचे मामा शशिकांत महामुनी यांचेकडे ती आठवीत असल्यापासून राहत आहे.समृद्धीने मामाच्या गावात राहून इयत्ता दहावीमध्ये तब्बल 99.20% गुण मिळवून पिलीव शाळेचे आजपर्यंतचे रेकॉर्ड मोडले आहे.समृध्दीने रेकॉर्ड ब्रेक गुण मिळवून आपल्या गावाचे,मामाचे,वर्ग शिक्षकाचे व आई-वडीलांचे नाव रोशन केले आहे.आपल्या मुलीने बाहेरगावी राहूनही इतके गुण मिळविले त्याचे श्रेय वर्ग शिक्षक श्री.अतुल पाटील यांना देत समृद्धीचे वडील मनोज पंडीत,आई सविता पंडीत अजोबा श्रीधर महामुनी,आज्जी छाया महामुनी यांनी श्री.अतुल पाटील सर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा यथोचित सन्मान केला.व प्रत्येक विद्यार्थ्यांनी समृद्धीचा व प्रत्येक वर्ग शिक्षकाने श्री.अतुल पाटील सर यांचा आदर्श घ्यावा आशी समृद्धीच्या आई-वडीलांनी अपेक्षा व्यक्त केली.