माळशिरस तालुक्यातील बचेरी येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील तरुण शेतकरी “विनोद यादव” याने मांडली अखंड महाराष्ट्रातील तमाम शेतकर्यांची व्यथा..!
पिलीव/सुजित सातपुते
इडा पिडा “टळू” दे
“बळीचं” राज्य येवू दे..!
माझी सर्व बी-बियाणे विक्रेते दुकानदार यांना हात जोडून विनंती आहे.आता मान्सूनचा पाऊस यायला सुरवात झाल्यानंतर सगळीकडे पेरण्याची लगबग सुरू होईल तर सर्व शेतकऱ्यांना तुम्ही दर्जेदार बी-बियाणे द्यावेत.तुमच्या किरकोळ नफ्यापोटी तुम्ही फसव्या कंपनीची बियाणे शेतकऱ्यांना देवू नका.कारण एकदा पेरल्यानंतर त्याला ते पीक पूर्ण येईपर्यंत काहींच करता येत नसतं परिणामी शेवटी त्या बियांणापासून कमी उत्पन्न मिळतं आणि शेतकरी देशोधडीला लागतो.अगोदरच निसर्गाची अनियमितता,सरकारचे हमीभावाचे तुटपुंजे धोरण,मशागत तसेच खतांच्या भरमसाट किंमती यामुळे शेतकऱ्यांची स्थिती सुधारत नाही.त्यातच तुम्ही बियाणे कमी प्रतीची दिली तर त्यावर अम्हां गरीब शेतकर्यांवर आत्महत्या शिवाय दुसरा पर्याय उरत नाही.आणि शेतकरी जगला तरच तुम्ही जगणार आहात.
त्यांच्या अशिक्षीत अडाणीपनाचा गैरफायदा घेऊ नका तुमच्या सारखाच त्यांचा पण प्रपंच असतो त्यामुळे कधीतरी त्यांचा पण विचार करा आणि दर्जेदार बी- बियाणे पुरवा व शेतकऱ्यांच्या लेकरा-बाळांचा आशिर्वाद मिळवा.अशा काळजला भिडणार्या शब्दातून माळशिरस तालुक्यातील बचेरी येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील तरुण शेतकरी विनोद यादव याने खत व बि-बियाणे विक्रेत्यांना डोळ्यात आंजण घालणारी झणझणीत व्यथा माळशिरस टाईम्सच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.
आशा आहे की एका तरुण शेतकऱ्याची ही सत्य व्यथा महाराष्ट्रातील सर्व खत व बि-बियाणे विकणार्या दुकानदारांपर्यंत पोहचेल व सर्व दुकानदार नकली बि-बियाणे न विकता असली बि-बियाणे विकतील व या अखंड महाराष्ट्राला “सुजलाम-सुफलाम” करतील.कारण शेतकरी जगला तर महाराष्ट्र जगेल आणि महाराष्ट्र जगला तर देश जगेल.
या निमित्ताने इतकेच…!