सई भोरे-पाटील उद्या स्वीकारणार अकलुज उपविभागीय पोलीस आधिकारी पदाचा पदभार..!
पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील अकलूजच्या उपविभागीय पोलीस अधिकारीपदी सई भोरे-पाटील यांची नेमणूक करण्यात अली असल्याचे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात आले.अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे यांचा दोन वर्षाचा कार्यकाल पुर्ण झाला असल्याने त्यांची शासकीय नियमानुसार नुकतीच श्रीरामपूर येथे बदली झाली होती.त्यामुळे अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी पद रिक्त होते.त्यांच्या जागी तुळजापूर येथे कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून आपली ओळख निर्माण करणार्या सई भोरे-पाटील यांची अकलुजच्या उपविभागीय पोलीस अधिकारीपदी नेमणूक झाली आहे.”सदरक्षणाय खलनिग्रहणाय”म्हणजेच सज्जनांचे रक्षण व दुर्जनांचे निर्दालन या पोलीस खात्याच्या ब्रीद वाक्याला अणुसरुन सई भोरे-पाटील यांनी तुळजापूर येथे आपली नौकरी बजावली असल्याने त्या तुळजापूर शहरात अल्पावधीतच लोकप्रिय ठरल्या होत्या.त्यांनंतर तेथून त्यांची सध्या अकलुज येथे नेमणुक झाली आहे.त्या सोमवार दिनांक 12 जून रोजी अकलुज उपविभागीय पोलीस कार्यालयाचा पदभार स्वीकारणार आहेत.त्यांचे माळशिरस टाईम्स परिवाराकडून माळशिरस तालुक्यात सहर्ष स्वागत व खूप शुभेच्छा…!