पिलीव येथील बँक ऑफ इंडीयाचे शांत,संयमी व कर्तव्यदक्ष शाखा प्रबंधक “विजय नाईक” यांची बदली : पिलीवकरांचे अश्रु अनावर..!

पिलीव/सुजित सातपुते

माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील बँक ऑफ इंडियाचे शाखा प्रबंधक शांत,संयमी व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून अल्पावधीतच आपली लोकप्रियता वाढवलेले विजय नाईक यांची पिलीव येथून थेट सोलापूर झोनल ऑफिस येथे बदली झाली आहे.पिलीव येथील बँक ऑफ इंडिया ही शाखा अनेक वर्षांपासून कार्यरत आहे.परंतु विजय नाईक यांच्या कार्यकाळात बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना जी समाधानकारक वागणूक/सेवा मिळाली ती सेवा या अगोदर कोणत्याही शाखाप्रबंधकाकडून मिळाली नसल्याचे पिलीवसह परिसरातील जाणकार लोकांकडून बोलले जात आहे.विजय नाईक यांच्यासह बँक अधिकारी अभिजीत मोहळे यांच्या तडकाफडकी बदलीने पिलीव,कुसमोड.झिंजे वस्ती,काळवाडी,चांदापुरी पठाण वस्ती,तांदुळवाडी,शिंगोर्णी,बचेरी,कोळेगाव यांसह इतर गावातील लोकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.सदरची बदली रद्द करून विजय नाईक यांना पिलीव शाखेतच ठेवावे अशी विविध सामाजिक संघटनांकडून मागणी होत आहे.अशा कर्तव्यदक्ष व संयमशील व्यक्तीची अचानक बदली झाल्याने बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांकडून संताप व्यक्त होत आहे व बदली रद्द करण्याची मागणी होत आहे.विजय नाईक यांनी पिलीव शाखेचा पदभार स्वीकारल्यापासून अनेक गोरगरीब व गरजू लोकांना कायद्याच्या कचाट्यात राहून सहकार्य केले असून अनेक सुशिक्षित बेकार तरुणांचे मजूरीकडचे हात ओळवून उद्योग धंद्यामध्ये गुंतविले आहेत तर अनेक वर्षांपासून थकीत असलेल्या थकबाकीदारांकडून थकबाकी वसूल केली आहे.त्यामुळे त्यांची पिलीसह परिसरामध्ये एक वेगळीच क्रेझ निर्माण झाली आहे.परंतु यांच्या अचानक बदलीची वार्ता परिसरामध्ये पसरताच लोकांना अश्रू अनावर झाले असल्याचे पहावयास मिळत आहे.

[

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *