सहकार महर्षी सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी संग्रामसिंह जहागिरदार यांची बिनविरोध निवड : पिलीव नगरीत जंगी स्वागत व सत्कार..!
पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील यशवंतनगर येथील सहकार महर्षी सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी पिलीव गावचे सुपुत्र व सोलापूर जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती तथा भाजपाचे नेते संग्रामसिंह अजिंतसिंह जहागिरदार यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अकलूज येथे जाहीर केल्याचे समजताच पिलीवसह पंचक्रोशीतील संग्रामसिंह जहागीरदार समर्थकांनी व शेतकरी बांधवांनी फटाक्यांची अतीषबाजी करत आपला आनंद साजरा केला.संग्रामसिंह जहागीरदार यांची निवड झाल्याने आता आपला ऊस 18/18 महीने तुरा येईपर्यंत रानात न राहता वेळेत कारखाना घेवून जाईल.व वेळेत ऊसाचे बिल मिळेल याप्रकारच्या परिसरातील शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्याचे पहावयास मिळाले.याच अनुषंगाने शेतकरी बांधवांनी व समर्थकांनी जहागीरदार यांच्या नागरी सत्काराचे आयोजन केले होते.काल शुक्रवार दिनांक 12 एप्रिल रोजी विजय पतसंस्थेत सत्कारकर्त्यांची मांदियाळी दिसुन आली.यावेळी ॲड.मानसिंह जहागिरदार,जयसिंह जहागीरदार,तेजसिंह जहागीरदार,पंचायत समितीचे सदस्य शहाजी (शेठ) महाडिक,मार्केट कमिटीचे नूतन सदस्य,बाबुराव कदम,माजी उपसरपंच विजयसिंग राजपूत,बचेरी गावचे सरपंच मंगेश पाटील,सुळेवाडी गावचे माजी उपसरपंच दुर्योधन सोलंकर,भाजपा शहर अध्यक्ष राजाभाऊ करांडे,चांदापुरी सोसायटीचे चेअरमन तनवीर पठाण,गजानन जाधव,माजी सरपंच आप्पासाहेब लोखंडे,विजय नागरी पतसंस्थेचे चेअरमन हनुमंत कोळी, सुषमाताई जामदार,ब्रह्मदेव लोखंडे, संजय जाधव ग्रामपंचायत सदस्य अविनाश जेऊरकर,वकील काझी, चंद्रकांत पिसे,दादा देशमुख,अफजलखान पठाण, रणधीरसिंग जामदार,बाजीराव जाधव,डॉ.सागर जाधव,डॉ.निलेश कांबळे,उमेश देशमुख,ज्येष्ठ पत्रकार दामोदर लोखंडे,प्रमोद भैस,तानाजी लोखंडे,समशेरसिंग राजपूत,मोहसिन शेख विजय सगरे यांसह अनेक शेतकरी व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील,चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील,आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील,माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे संघटक सरचिटणीस महामंत्री धैर्यशील मोहिते-पाटील या सर्वांनी जो माझ्यावर विश्वास दाखवून मला शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी दिली आहे.त्या संधीचं शेतकर्यांची सेवा करुन सोनं करणार असल्याचे संग्रामसिंह जहागीरदार यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.