पिलीव येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी…!

पिलीव/प्रतिनीधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी झाली. सालाबादप्रमाणे विरशैव लिंगायात समाजा तर्फे पिलिव मध्ये महात्मा बसवेश्वर जयती मोठ्या थाटामाटात साजरी झाली.
जयंती चे औचित्य साधून सकाळी विरशैव लिंगायात समजाने राजस्तरीय वधू – वर परिचय मेळावा घेतला होता, ह्या मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळाला सुमारे 150 मुला मुलींनी मेळाव्यास भेट देऊन नावनोंदणी केली.
तर सायकाळी माढेकर महाराज आणि शिंगणापूर कर महाराज यांचे प्रवचन ,सुहास उरवणे यांचे महात्मा बसवेश्वर यांच्या वरील व्याख्यान व अध्यक्षीय भाषण झाले ,या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून आमदार. विजयकुमार देशमुख,तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर उपस्थित होते.
यावेळी विरशैव लिंगायात समाजाचे अध्यक्ष शुभजीत नष्टे ,उपाध्यक्ष ऋषिकेश देशमुख,सचिव गणेश देशमुख,महात्मा बसवेश्वर जयती उत्सव समितीचे अध्यक्ष संकेत देशमुख, अमोल नष्टे,विनायक आर्वे,सुहास कोल्हे,चंद्रकांत धसाडे, ,शिवम घोंगडे,प्रथमेश घोंगडे , आरव जेऊरकर,यश उरवणे यांनी परिश्रम घेऊन जयती पार पाडली.
यावेळी समजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राजकीय,सामजिक व अन्य क्षेत्रातील सर्वाचा सन्मान ट्रॉफी देऊन ही करण्यात आला. यावेळी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख,शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, विरशैव लिंगायात समाजाचे अध्यक्ष शुभजीत नष्टे , माजी उपसरपंच नानासाहेब देशमुख,अविनाश जेऊरकर,अशोकभाऊ घोंगडे,उमेश देशमुख,कल्याण नष्टे,सुरेश घोंगडे विजय सगरे, नामदेवराव देशमुख,वैभव मेथवडे,बंडू स्वामी,भाऊ स्वामी ,महादेव शेटे गुरुजीव समजातील अन्य मान्यवर उपस्थित होते.

फोटो – मंचावर उपस्थित व्याख्यान देताना शिंगणापूर महाराज ,तसेच आमदार विजयकुमार देशमुख,भाऊसाहेब आंधळकर , शुभजित नष्टे,नानासाहेब देशमुख,अशोक घोंगडे,अविनाश जेऊरकर व अन्य मान्यवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *