पुणे येथे डॉ.डी वाय पाटील महाविद्यालयात शिकत असलेला पिलीव येथील “सुरज कांबळे” झाला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा उपाध्यक्ष..!

पिलीव/प्रतिनीधी

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशांतर्गत पुणे येथील महाविद्यालयांच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या काल निवडी जाहीर करण्यात आल्या.देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारानुसार येणाऱ्या काळात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून सर्व सामान्य विद्यार्थ्यांच्या विकासात भरीव कार्य करणे,गोर-गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे,अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निवारण करणे,संघटना मजबूत करणे अशा प्रकारची विवीध उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवूनच सदरच्या निवडी जाहीर केल्या असल्याचे प्रदेश सरचिटणीस तन्मय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.याच अनुषंगाने डॉ डी.वाय पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आकुर्डी,पुणे या महाविद्यालयाच्या अध्यक्षपदी आदित्य गोरक्षनाथ देशमुख तर उपाध्यक्षपदी माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील सुरज अशोक कांबळे यांच्या बिनविरोध निवडी जाहीर करण्यात आल्या असल्याचे तन्मय देशमुख यांनी सांगितले.अनेक दिवसांपासून मी निस्वार्थीपणे विद्यार्थ्यांसाठी काम करत आहे.त्याच कामाची पोहच पावती म्हणून माझ्यावर विश्वास टाकून तन्मय देशमुख यांनी उपाध्यक्षपदाची धूरा माझ्या खांद्यावर दिली आहे.त्यामुळे मी व माझा मित्र आदित्य देशमुख वरीष्ठांच्या विश्वाला तडा न जावू देता व पदाचा गैरवापर न करता 24 तास विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी जबाबदारीने तत्पर राहू अशी माळशिरस टाईम्सच्या माध्यमातून नवनियुक्त उपाध्यक्ष सुरज कांबळे यांनी ग्वाही दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *