पिलीव येथील नामांकित आशा कोहिनूर इलेक्ट्रिकल&मोटार रिवायडींग दुकानाला लागली भीषण आग : सुमारे दहा लाखांचे नुकसान..!
पिलीव/प्रतिनीधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील अनेक वर्षापासून कोहिनूर इलेक्ट्रिकल अँड मोटर रिवायडींग या नावाने सुभाष काळे यांचे लोहार गल्ली येथे मोठे दुकान आहे.त्याच कोहिनूर दुकानात आज गुरुवार दिनांक 4 मार्च 2023 रोजी दुपारी 4:00 वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्कीटमूळे अचानक स्पोट होऊन भडका झाला व सदर भडक्याचे हाहा म्हणता आगीत रूपांतर झाले व दुकानाला भीषण आग लागली.सदराच्या दुकानांमध्ये विद्युत पंप व इतर इलेक्ट्रिकल वस्तू मोठ्या प्रमाणात दुरुस्तीसाठी आल्याने सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत.त्यामुळे साधारणता सुमारे दहा लाखाच्या आसपास सुभाष काळे यांचे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे.