आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ विचारवंत,श्री.नंदादेवी माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज,जामखेडचे माजी प्राचार्य,डॉ.सत्येंद्रसिंह चव्हाण यांचे जेष्ठ बंधू आदरणीय एस.बी.चव्हाण यांची बार्टी मुख्यालयास सदिच्छ भेट…!

पिलीव/सुजित सातपुते

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे येथे मंगळवार दिनांक 2 मे 2023 रोजी विस्तार व सेवा आयबीपीएस विभागाचे विभागप्रमुख डॉ.सत्येंद्रनाथ चव्हाण यांचे मोठे बंधु आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत श्री नंदादेवी माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज,जामखेड जिल्हा नगर येथील माजी प्राचार्य मा.एस.
बी.चव्हाण यांनी बार्टी मुख्यालयास सदिच्छा भेट देवून विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास व बुध्दमुर्तीस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी डॉ.सत्येंद्रनाथ चव्हाण यांच्या हस्ते त्यांना भारतीय राज्यघटनेची प्रत भेट देऊन सन्मानित करण्यात आले.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश राक्षे यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते विवेक वाघमारे यांनाही भारतीय राज्यघटनेची प्रत भेट देऊन सन्मानित करण्यात आले.माजी प्राचार्य चव्हाण यांनी बार्टी मुख्यालयातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे दुर्मिळ छायाचित्रे, सभागृह, ग्रंथालयाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.प्रकाशन विभागाचे रामदास लोखंडे यांनी त्यांना बार्टी संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना व उपक्रमाची माहिती दिली.यावेळी ज्येष्ठ साहित्यिक लेखक सुरेश पाटोळे -पुणे,कार्यालय अधिक्षक सुभेदार सचिन जगदाळे, प्रकल्प व्यवस्थापक नितिन सहारे,प्रकल्प अधिकारी श्रीमती सुनंदाताई गायकवाड,अतिष पेढे यांच्यासह बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *