पिलीव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रेशन कार्डच्या विवीध समस्यांचे होणार निवारण – रणजीत सातपुते..!

पिलीव/प्रतिनीधी
माळशिरस तालुक्यातील पिलीवसह चांदापुरी,पठाण वस्ती,कुसमोड,झिंजेवस्ती,सुळेवाडी,काळमवाडी,बचेरी,शिंगोर्णी आदि गावातील अनेक लोकांच्या रेशन कार्ड बाबत विविध समस्या आहेत.सदर समस्यांचे अनेक दिवसांपासून निवारण न झाल्या अनेक लोक स्वस्त धान्य दुकानातून मिळत असलेल्या अन्नधान्या पासून वंचित असल्याचे पहावयास मिळत असल्याचे लक्षात येताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका उपाध्यक्ष रणजीत सातपुते यांनी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून शनिवार दिनांक 29 एप्रिल 2023 रोजी माळशिरस तालुक्याचे प्रभारी तहसीलदार तुषार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जीर्ण झालेले रेशन कार्ड नवीन करून देणे,रेशन कार्ड मध्ये नवीन नाव समाविष्ट करणे,रेशन कार्ड मधील नाव रद्द करणे,किंवा नावात बदल करणे यांसह विविध समस्यांचे निवारण करण्यासाठी पिलीव येथील श्री स्वामी समर्थ हॉटेलच्या पाठीमागे आर्वे कॉम्प्लेक्समध्ये प्रज्ञा ई – सेवा केंद्र येथे रेशन कार्ड समस्यांचे निवारण या शिबिराचेआयोजन केले आहे.तरी पिलीवसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या शिबिरास उपस्थित राहून आपल्या रेशन कार्ड बाबत असलेल्या समस्यांचे निवारण करून घ्यावे असे आवाहन रिपाईचे तालुका उपाध्यक्ष रणजीत सातपुते यांनी माध्यमांद्वारे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *