प्रियंका तरंगे हिची पोलीस पदी तर स्वाती मदने यांची कुसमोडच्या उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल सत्कार..!
पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील तरंगफळ येथील प्रियंका नामदेव तरंगे हिची रत्नागिरी येथे महाराष्ट्र पोलीस पदी निवड झाल्याबद्दल तर स्वाती नाथा मदने यांची कुसमोड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल लक्ष्मीनगर ( कुसमोड) येथे या दोघींचा सत्कार करण्यात आला.प्रियंका तरंगे ही पत्रकार संजय पाटील यांची भाची आहे.यावेळी झिंजेवस्तीचे माजी उपसरपंच सर्जेराव मदने, बापुराव झिंजे,नानासो लवटे, पिलीव विकास सेवा सोसायटीचे सदस्य नबाजी मदने ,कुसमोडचे माजी उपसरपंच संजय पाटील, विजय मदने, सतीश गोंजारी, शशिकांत घडयाळे, विनायक मदने, अंकुश मदने, यंकु पवार, बाबुराव पवार, पांडुरंग गलांडे, वैभव राऊत ,लक्षमण वाघमोडे, शंकर मदने, नामदेव तरंगे, दादासो मदने, यल्लापा पवार,राहुल मदने,सुरेश मदने,सागर गोंजारी, अमोल मदने ,दत्तु गारुळे, महेश जाधव,किरण पवार, बुवा पवार यांच्या सह अनेक मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.