बचेरी येथील डिझाईनर किंग सागर काटे बनतोय संगणक क्षेत्रातील तरुणांचा आयडॉल..!
पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील दुष्काळी भाग म्हणून महाराष्ट्रभर ओळख असलेल्या बचेरी गावातील सागर पोपट काटे या तरुणाची घरची परिस्थिती तशी बेताचीच परंतु परिस्थितीचे भांडवल न करता आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर व आई-वडिलांच्या आशिर्वादाने संगणक क्षेत्रातील डिझाईनिंक या कोर्समध्ये आपले करिअर घडविण्याच्या हेतूने स्वतःला झोकून देऊन पुणे येथे चार ते पाच वर्ष राहून डिझाईनिंग ही कला जोपासून आज सागर हा अवघ्या 23 व्या वर्षी संगणक क्षेत्रातील डिझाईनर किंग बनला आहे.त्याची महाराष्ट्रभर ऑनलाईन कामे सुरू असल्याचे पहावयास मिळत असून ग्रामीण भागातून आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहून अगदी अल्पावधीतच आपल्या मुलाने नाव कमावले असल्याने सागरच्या आई-वडिलांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत असल्याचे पहावयास मिळाले.मी पुण्यामध्ये शिक्षण घेत असताना मला खूप अडचणींचा सामना करावा लागला परंतु माझ्या आई-वडिलांची व माझ्या मित्र कंपनीची मोलाची साथ व मोलाचे मार्गदर्शन लाभले असल्याचे सागरने माध्यमांशी बोलताना सांगितले.संगणक क्षेत्रातील डिझायनिंग हा कोर्स अतिशय किचकट व तितकाच अवघड असल्याने हा कोर्स करणारी मुले फार कमी आहेत.त्यामुळे सध्या तरी या क्षेत्रातील मुलांना खूप मोठे महत्व प्राप्त झाले आहे.संधीचे सोने करावे या म्हणीप्रमाणे महत्त्व प्राप्त झालेल्या गोष्टीचा फायदा घेत सागरने या क्षेत्रात अगदी नयनरम्य अशी कलाजोपासत गगन भरारी घेतली आहे.अवघ्या 23 व्या वर्षी एका खेड्यातील मुलगा तो ही संगणक क्षेत्रातील अवघड अशा डिझाईनिंगमध्ये आपले महाराष्ट्रभर नावलौकिक करू शकतो याचे जिते-जागते उदाहरण म्हणजे माळशिरस तालुक्यातील बचेरी येथील सागर पोपट काटे असे म्हणले तर वावगे ठरणार नाही.आपण स्वतः इतक्या कष्टातून व गरिबीतून हा डिझाईनिंग चा कोर्स पूर्ण केला आहे.म्हणून इतरांना हे ज्ञान आत्मसात न होऊ देता आपण आपलेच मार्केट वाढवायचे हा कुटील हेतू डोळ्यासमोर न ठेवता गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना सागर वेळोवेळी डिझायनिंग क्षेत्रातला अगदी मोफत व वेळ काढून सल्ला देत असतो.त्यामुळे पिलीवसह पंचक्रोशीतील संगणक क्षेत्रातील युवा पिढीचा सागर काटे हा आयडॉल बनला आहे.आपल्या अंगी कसलाही अहंकार न बाळगता अगदी मनमोकळेपणाने आपल्याजवळ येईल त्या विद्यार्थ्यांच्या किंवा तरुणांच्या संगणक क्षेत्रातील ज्या काही समस्या असतात त्याचे सागर अगदी मोफत पणे व पूर्णवेळ देऊन त्या समस्येचे निवारण करत आहे.त्यामुळे सागर जरी हलाखीच्या परिस्थितीत पुणे येथे शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभा राहिला असला तरी इथून पुढे पिलीवसह परिसरातील एकही विद्यार्थी मुंबई पुण्याला न जाता सागरच्या मार्गदर्शनाखाली संगणक क्षेत्रातील डिझाईनिंग या कोर्समध्ये शंभर टक्के आपले नाव लौकिक करतील,गुणवत्ता यादीत झळकतील,आपापल्या आई-वडिलांचे नाव रोशन करतील वा गावाच्या वैभवात भर टाकतील यात तीळ मात्र शंका नाही.सागर काटे तुझ्या कार्याला मनापासून सॅल्यूट…!