पाण्यासाठी मतदानावर बहीष्कार:गावाला मिळाला कारखान्याचा आधार चेअरमन एन.शेषागिरी राव बचेरी गावासाठी ठरले देवदूत..!
पिलीव/सुजित सातपुते
सदगुरु श्री श्री साखर कारखाना राजेवाडी या कारखान्याचे चेअरमन एन.शेषागिरी राव यांच्यापुढे मंगळवार दि. 21/03/2023 रोजी बचेरी गावचे शिष्टमंडळ सरपंच महादेव पाटील ,उपसरपंच मोहन शिकारे ,प्रा सदाशिव शिंदे ,बिराभाई शिंदे , गणेश काका गोडसे , विश्वजित गोरड, राजु गटकुळे,श्रीकांत गटकुळे यांनी गावच्या पिण्याच्या पाण्याची व्यथा मांडली गावातील नागरीक पाण्यासाठी वनवन भटकत आहेत व पाणी समस्या पुढील 2 महिने सोडविण्याची विनंती केली.आठवड्यातून दोन वेळा पाणी देण्याची विनंती शिष्टमंडळाने केली.परंतु इतर दिवशी लोक कुठुन पाणी आणणार व 2 महिण्यात पाऊस येईल का असे बोलून चेअरमन राव यांनी दोन दिवसाऐवजी दररोज पाऊस पडेपर्यंत पाणी घ्या असे सांगितले.यासाठी तात्काळ मंजुरी देऊन सिवील इंजिनियर जमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करुन घेण्यास सांगितले.त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीतून 2012 सालीही चेअरमन राव यांनी व व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर यांनी पिलीव कॕनल खाली गावच्या पाणीपुरवठा विहीरीसाठी 2 गुंठे जागा दिली आहे.तेथून पाणीपुरवठा पाईपलाईन करणेसाठी कारखाना चारी खोदण्यासाठी व इतर अडचणी सोडविण्यासाठी सहकार्य करेल असे चेअरमन यांनी शिष्टमंडळला सांगितले.सदर प्रसंगी कारखान्याच्या संचालिका सौ.उषाताई मारकड उपस्थित होत्या.तीव्र टंचाई असतानाही शासन प्रशासन यांनी पाणी विषयावर गांभीर्य दाखविले नाही.मात्र सदगुरु श्री श्री रविशंकर यांचे शिष्य उद्योगपती , सामाजिक बांधिलकी जपणारे एन.शेषागिरी राव यांनी बचेरी गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्पुरता का होईना परंतु टंचाई काळात सोडवलेबद्दल ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी चेअरमन राव यांचे व कारखान्याचे आभार मानले.
#चौकट
गावच्या समस्या सोडविण्यात कारखाना प्रशासनाचे मोठे योगदान व सहकार्य आहे सदगुरु श्री श्री साखर कारखान्यामुळे बचेरीसह परिसरातील रस्ते व आर्थिक विकास झाला आहे त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपणा-या सदगुरु श्री श्री कारखान्याचे ग्रामस्थांकडून कौतुक होत असून आमच्या गावासाठी चेअरमन हे देवदूत ठरले आहेत.
मंगेश पाटील
सरपंच,ग्रा.पं बचेरी