कायदा व सुव्यवस्थेचे पालन करुनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची उत्सवात जयंती साजरी करावी – पोनि राजेंद्र टाकणे..!
पिलीव/सुजित सातपुते
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी करताना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेल्या आदर्शाचे पालन करून आनंदाने,उत्साहात,संघटितपणे सामाजिक सलोखा राखून व कायदा सुव्यवस्थेचे पालन करुनच जयंती अगदी उत्सहात साजरी करावी.असे अवाहन माळशिरस तालुक्यातील पिलीव परिसरातील जयंती उत्सव समितीच्या कार्यकर्त्याच्या आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांनी केले.बैठकीच्या अध्यक्षस्थानी पिलीव ग्रामपंचायतचे सरपंच नितीन मोहिते-माळी होते.यावेळी प्रास्ताविकात उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करून दामोदर लोखंडे यांनी कार्यकर्त्यांचा परिचय करून देताना पिलीव परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शांततेच्या वातावरणात व विविध उपक्रम राबवून साजरी करण्याची परंपरा असल्याचे सांगितले.यावेळी पुढे मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांनी आपापल्या गावात डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यांच्या प्रतिमेचे पूजन विधिपूर्वक करावे चांगले उपक्रम राबवावेत त्याचप्रमाणे स्वतःच्या गाडीला मोठाले झेंडे लावू नयेत.अडचणीच्या ठिकाणी बॅनर पोस्टर लावू नयेत पोस्टर लावताना इतर धर्मियांच्या किंवा समाजाच्या भावना दुखावणार नाहीत याची दक्षता घ्यावी तसेच मिरवणुकीमध्ये डी.जे व डॉल्बी न लावता पारंपारिक वाद्य बँड पथक लेझीम,हलगी अशाप्रकारे वाद्याचा वापर करावा.त्याचप्रमाणे मिरवणुकीत दंगा करु नये,आवाजाची मर्यादा राखावी,भीम गीते लावून वेगवेगळे उपक्रम राबवून मिरवणूक शांततेच्या व आनंदीमय वातावरणात पार पाडावी कोणीही कायद्याचे उल्लंघन करू नये.नाईलाजास्तव कायदा मोडणारावर कायदेशीर कारवाई केली जाईल.म्हणून मिरवणुकीत चांगले उपक्रम राबवून जयंती महोत्सव आनंदात व उत्साहात साजरी करण्याचे त्यांनी आव्हान करताना विविध ठिकाणी जयंती उत्सवात आलेल्या अनुभवाचे कथन केले व जयंती साजरी करीत असताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.यावेळी पिलीव औट पौस्टचे पोलीस नाईक अभिजीत कणसे,पंडित मिसाळ,पोलीस पाटील अण्णासाहेब शिकारे परिसरातील यांसह पिलीव,बचेरी,चांदापुरी झि़जेवस्ती,शिंगोर्णी,कुसमोड आदि ठिकाणाहून जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार प्रदर्शनकरताना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कायद्याचे शिस्तीचे व विविध उपक्रम राबवून आनंदात साजरी केली जाईल अशी ग्वाही कार्यकर्त्यांच्या वतीने सरपंच नितीन मोहिते-माळी यांनी दिली.