अशोक सोनवणे भागविणार पठाण वस्ती गावची तहान : लाखो रुपये कींमतीची जागा केली दान..!

पिलीव/सुजित सातपुते
स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतर ही दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या माळशिरस तालुक्यातील कायम दुष्काळी 22 गावांना दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प अनेक नेत्यांनी हातात घेतला असून निरा देवधर धरणाच्या पाण्यासाठी संघर्ष करणारे अनेक नेते आहेत.परंतु चालूचे काय?असाच प्रश्न उपस्थित केला आहे कायम दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या माळशिरस तालुक्यातील पठाण वस्ती गावच्या एका नवनियुक्त 65 वर्षाच्या ग्रामपंचायत सदस्याने त्या अवलियाचे नाव आहे अशोक रामा सोनवणे उन्हांळा,पावसाळा,हिवाळा या तिन्ही ऋतूत कोरडी पडलेली जमीन आणि तळ गाठलेल्या विहिरी,नाले,बंधारे असे चित्र असलेल्या पठाण वस्ती गावामध्ये पाण्यावाचून जनावरांचे होणारे हाल,ग्रामस्थांना पाण्यासाठी करावी लागत असलेली कोसोपायपीठ,ऋतू कोणताही असू पाण्याचा शोध घेणे हा पठाण वस्तीच्या ग्रामस्थांसाठी एक प्रमुख उद्योगच बनला आहे असे म्हणले तर वावगे ठरणार नाही.गावातील ग्रामस्थांचे चेहरे टँकरची आशेने वाट पाहत असतात.पाण्याचा टँकर चालू जरी असला तरी दीड दोन हजाराच्या लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये निम्म्या लोकांना कसलेच पाणी मिळत नाही असे गावकऱ्यांचे म्हणने आहे.गावातील बायका,मुलं,अबालवृध्द आपला जीव धोक्यात घालून विहिरी-बारवांमधून पाणी काढतात तरीही प्रश्नसनाला येथील लोकांच्या जीवाची चिंता ना काळजी अशा दुष्काळी परिस्थितीत करायचे काय?आणखी उन्हांळा सुरु होतोय तोपर्यंतच मार्च महिन्याच्या तोंडालाच सर्व विहिरी,बोअर,नाले,बंधारे कोरडे पडले आहेत.त्यामुळे पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे पाण्याचा टँकर कधीच वेळेत येत नाही.अशातच माणुसकीच्या आणि गावच्या प्रेमापोटी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो.गावातील लोकांची पाण्यासाठी होत असणारी वणवण थांबवण्यासाठी ग्रा.पं सदस्य अशोक सोणवने वय वर्ष 65 असलेल्या या आवलियाने कसलीही अपेक्षा न ठेवता आपली स्वतःची दोन्हीं ओढ्याच्या कढेला अगदी 100% पाणी लागेल अशा ठिकाणची लाखो रुपये किंमतीची 2 गुंठे जागा ग्रामपंचायतला बक्षीस पत्र करून दिली आहे.यामुळे अशोक सोणवने यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत असल्याचे पहावयास मिळत आहे.या जमिनीमध्ये भली मोठी अशी लवकरच विहीर पाडून पठाण वस्ती गावाचा पाणी टंचाईचा कायमचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे लोकनियुक्त सरपंच एजाज पठाण यांनी माध्यमांशी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *