पिलीव येथील हनुमंत कोळी यांच्या निवडीने विजय नागरी सहकारी पतसंस्थेने टाकली कात:संचालक मंडळात ही नामांकीत व बलाढ्य लोकांचा समावेश..!
पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील स्वर्गीय अजितसिंह जहागीरदार यांनी परिसारातील गोरगरीब व गरजूसांठी स्वतःच्या व सभासदांच्या अथक प्रयत्नातून उभा केलेली विजय नागरी सहकारी पतसंस्था अनेक वर्षांपासून गावामध्ये अगदी सुरळीतपणे चालू होती.परंतु मध्यंतरी काळात काही तांत्रिक अडचणीमुळे व कर्जदारांनी वेळेत कर्जफेड न केल्यामुळे स्वर्गीय अजितसिंह जहागीरदार यांच्या निधनानंतर पतसंस्था मोडखळीस आली व अजितसिंह जागीरदार यांनी अथक प्रयत्नातून नावारूपाला आणलेली पतसंस्था अगदी संत गतीने चालू लागली.परंतु आज बुधवार दिनांक 15 मार्च रोजी स्वर्गीय अजितसिंह जहागीरदार यांचे सुपुत्र तथा सोलापूर जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन चे माजी सभापती संग्रामसिंह जहागीरदार यांच्या मार्गदर्शनाखाली एक बैठक आयोजित करण्यात आली व या बैठकीत आज रोजी पिलीवसह परिसरामध्ये एक निष्कलंक व्यक्ती म्हणून ओळख असलेले हनुमंत रामचंद्र कोळी यांची विजय नागरी पतसंस्थेच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली.त्यामुळे विजय नागरी पतसंस्थेने कात टाकली असून संत गतीने चालत असलेली पतसंस्था पुन्हां नव्या उमेदीने उभारी घेईल असे म्हणले तर वावगे ठरणार नाही.यामध्ये शब्बीर इसाक काझी यांची व्हाईस चेअरमनपदी निवड करण्यात आली असून संचालक मंडळ खालील प्रमाणे असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी बंडगर साहेब यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.संग्रामसिंह जहागीरदार,अविनाश जेऊरकर,प्रकाश जाधव,उमेश देशमुख,शिवाजी इंगळे,सुभाष बुगड ,नाना मदने,जयश्री खरे मॅडम,सुषमा ताई जामदार इत्यादी नामांकित लोकांचा संचालक मंडळात समावेश करण्यात आला आहे.यावेळी सरपंच नितीन मोहिते,माजी चेअरमन दत्तात्रय जावळे, माजी व्हाईस चेअरमन शंकर करडे ,विजयसिंग राजपूत ,मोहसीन शेख,मॅनेजर किरण आर्वे,निवडणूक निर्णय अधिकारी बंडगर साहेब यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.