पठाण वस्ती मोहीते-पाटील घरण्याशी पिढ्यान् पिढ्या एकनिष्ठ राहीली आहे : पठाण वस्ती गावच्या विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही-विजयसिंह मोहिते-पाटील
पिलीव/प्रतिनीधी
माळशिरस तालुक्यातील दुष्काळी भाग म्हणून गावाची ओळख असलेल्या पठाण वस्ती या गावातील भाजप पुरस्कृत मोहिते-पाटील या गटाने ग्रामपंचायत मध्ये जोरदार मुसंडी मारून विरोधकांना चितपट करून नऊ पैकी नऊ नेंबर बहुमताने विजय करून लोकनियुक्त सरपंच ही निवडून आणला असल्याने काल रविवार दिनांक 12 मार्च रोजी सायंकाळी 6:00 वाजता पठाण वस्तीच्या सर्व ग्रामस्थांनी मिळून नवनियुक्त सरपंच व सदस्यांच्या भव्य अशा सत्कार समारंभाचे आयोजन व गाव जेवणाचे आयोजन केले होते.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व अकलुज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह-मोहिते पाटील यांची उपस्थिती होती.सदरच्या कार्यक्रमा प्रसंगी विजयसिंह मोहिते-पाटील आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सांगत होते की पठाण वस्ती गावात जास्त मुस्लिम समाज असला तरी तो पिढ्यान् पिढ्या मोहिते-पाटील घराण्याशी एकनिष्ठ राहिला आहे व येथून पुढेही एकनिष्ठच राहील याची मला खात्री आहे.त्यामुळे पठाण वस्ती गावातील लोकांना कसल्याही प्रकारची अडचण आली तरी त्यांना अकलूज येथील शिवरत्नची दारी 24 तास खुली आहेत व पठाण वस्ती गावच्या विकासासाठी मी कसलाही निधी पडून निधी कमी पडू देणार नाही.यावेळी मदनसिंह मोहिते-पाटील यांनी माझ्याकडून जेवढी काही मदत लागेल तेवढी मदत करण्यासाठी मी तत्पर असल्याचे गावकऱ्यांना आश्वासन दिले.या कार्यक्रमास पिलीव गटाचे जि.प सदस्य गणेश पाटील,बोरगाव गटाचे अरुण तोडकर,शुकूरखान पठाण,पठाणवस्तीचे लोकनियुक्त सरपंच एजाज पठाण,पठाणवस्ती-चांदापुरी सोसायटीचे चेअरमन तनवीर पठाण,फारुखान पठाण,शब्बीर पठाण,मोहनखान पठाण,मुबारक सय्यद,मुसेखान पठाण,इन्तियाज पठाण,महादेव शेटे,सदाशिव कनप,सतिश सरतापे,तिसमारखान पठाण,हसीम बक्शी,बक्सारखान पठाण,मल्हारी मगर,सर्व ग्रामपंचायत सदस्य,युवक वर्ग व पिलीव,सुळेवाडी,चांदपुरी,निमगाव यांसह आजूबाजूच्या इतर गावातील आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.