पिलीव येथील राजपुत गल्ली येथे महीला दिन मोठ्या उत्सहात साजरा : कर्तुत्वान महीलांची उपस्थिती…!

पिलीव/प्रतिनीधी
महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक 28 फेब्रुवारी 1909 रोजी न्यू यॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही सन 1910 च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेले सूचनेनुसार 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला आहे.याचेच औचित्य साधुन माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील राजपूत गल्ली येथे परिसरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.महिलांनी आपल्या अंगी असलेले विविध प्रकारचे कौशल्य,मनोगत,खेळ सादर केले व महीलाही कशात कमी नसल्याचे दाखवून दिले.यावेळी सौ.रेखादेवी जहागीरदार,नम्रतादेवी जहागीरदार,जेष्ठ मार्गदर्शिका सौ.जयश्री खरे मॅडम,उपसरपंच सौ.सोनाली करमाळकर,ग्रामपंचायत सदस्या ज्योतिताई फाळके,सौ.मंदाकिनी बुगड,सौ.गबाळे मॅडम,सौ.तुंगळे,सौ.प्रियांका राजपूत,सौ.काजल राजपूत,सौ.खलीपे,सौ.कविता राजपूत यांसह इतर महीलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *