होलार समाज यंग ब्रिगेडच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी सुहास बेरलिंगे तर उपाध्यक्षपदी नाथाजी पारसे यांची सर्वानुमते निवड..!
कोळेगांव/सतिश पारसे
होलार समाज यंग ब्रिगेड महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी सुहास बिरलिंगे तर उपाध्यक्ष पदी कोळेगावचे नाथाजी पारसे यांची निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री दादासाहेब नामदास यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन करण्यात आली. होलार समाज यंग ब्रिगेडच्या माळशिरस येथील कार्यालयात बुधवार दिनांक 8 मार्च रोजी या निवडीचे आयोजन करण्यात आले होते. निवड करताना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री दादासाहेब नामदास म्हणाले, सुहास बिरलिंगे यांनी माजी माळशिरस तालुका अध्यक्ष अभिजीत केंगार यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना वाढवण्यासाठी चांगली कामगिरी केली आहे त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन होलार समाज यंग ब्रिगेडच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी यांची निवड करताना मला आनंद होत आहे. त्यांच्या खांद्यावर संघटनेने मोठी जबाबदारी दिली असून संपूर्ण तालुक्यामध्ये होलार समाज यंग ब्रिगेडचे जाळे निर्माण करून संघटना आणखी मजबूत करावी. त्यासाठी संघटना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.
नूतन अध्यक्ष सुहास बिरलिंगे व नाथाजी पारसे यांनी निवडीबद्दल बोलताना सांगितले की, संघटनेमध्ये काम करत असताना कोणत्याही पदाची अपेक्षा केली नव्हती फक्त काम करीत राहिलो आणि या कामाची पोचपावती म्हणूनच होलार समाज यंग ब्रिगेडच्या माळशिरस तालुकाध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी आम्हाला देण्यात आली ती जबाबदारी आम्ही सर्वांच्या सहकार्याने पार पाडू.
यावेळी रिपाईचे नेते विकासदादा धाइंजे,होलार समाज यंग ब्रिगेड संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब नामदास, मार्गदर्शक सरदार आप्पा नामदास, बापूसाहेब ऐवळे , होनमाने साहेब, जिल्हाध्यक्षा जयश्रीताई बिरलिंगे, डॉ.राहुल केंगार,युवानेते माजी माळशिरस तालुका अध्यक्ष अभिजीत केंगार, पंढरपूर तालुका अध्यक्ष मारुती ऐवळे, कार्याध्यक्ष सागर पारसे, सचिव दादासाहेब करडे,सहसचिव सचिन हेगडे, उपाध्यक्ष मोहन करडे, गोविंद ऐवळे, पराग गोरे तसेच समाज बांधव उपस्थित होते.
निवडीबद्दल सुहास बिरलिंगे व नाथाजी पारसे यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे