माळशिरस पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांची अकलूज येथे बदली : राजेंद्र टाकणे स्वीकारणार माळशिरस पोलीस स्टेशनचा पदभार..!
पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष व गुन्हेगारांचा कर्दनकाळ बनलेले पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांची अकलूज येथे बदली झाली असून माळशिरस येथे राजेंद्र टाकणे यांची नेमणूक करण्यात आली आहे.राजेंद्र टाकणे हे आज किंवा उद्या सोमवार दिनांक 6 मार्च रोजी माळशिरस पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारणार आहेत.सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी यांच्या दिनांक 4 मार्च रोजी बदल्या झाल्या असल्याचे सोलापूर जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे यांनी जाहीर केले आहे.माळशिरस येथील पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांची बदली अकलूज पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक म्हणून झाली आहे. तर सोलापूर येथील नियंत्रण कक्ष येथील राजेंद्र टाकणे यांची माळशिरस पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली आहे.
दिपरतन गायकवाड यांनी आपल्या कार्यकाळात त्यांनी उत्तुंग अशी कामगिरी केली आहे.
तसेच माळशिरस पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणार्या सर्व गावातील हातभट्टी दारु 100% बंद करुन तात्कालीन पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्या आॕपरेशन परिवर्तन या मोहीमेची काटेकोर अंमलबजावणी करुन अनेकांचे अवैध्य धंद्याकडचे हात ओळवून उद्योग धंद्यात गुंतवले असल्याने ते चर्चेत आले होते.अनेक गुन्हे उघडकीस आणून आरोपीना जेरबंद केले.व सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून गुन्हेगारी संपुष्टात आणली होती व चांदापुरी येथील 3 माजी सरपंच अवैद्यरित्या हातभट्टी दारु काढत असल्याने त्यांच्यावर 328 कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करुन चक्क तीन्हीं माजी सरपंचाना वन टाईम अटक करुन 15 दिवस सोलापूर जेलमध्ये टाकले होते.त्यामुळे वरीष्ठ अधिकार्यांकडून दिपरतन गायकवाड यांचे वेळोवेळी कौतुक व अभिनंदन होत आसल्याचे पहावयास मिळत होते.