पिलीव येथील संयुक्त शिवजन्मोत्सव समितीच्या उपक्रमाचा माळशिरस तालुक्यासह जिल्हाभर होतोय गाजावाजा : ना कुठली जात-पात,ना कसले राजकारण आठरा पगड जातीच्या तरुणांनी एकत्र येवून केली रयतेच्या राजाची जयंती..!
पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील संयुक्त शिवजन्मोत्सव समितीच्यावतीने अखंड हिंदुस्थानाचे अराद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिलीवसह परिसरातील विविध जाती-धर्मातील तरुणांनी एकत्र येवून प्रथमच भव्य अशा रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन पिलीव गावचे सुपुत्र मेजर मयुर विजयकुमार नष्टे यांच्या शुभाहस्ते करुन कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.यावेळी एकुण 56 शिवप्रेमी रक्तदान करुन महाराजांना अभिवादन केले.सोलापूर येथील अक्षय ब्लड बँकेचे डॉक्टर व कर्मचारी वृंद यांनी रक्तदात्यांचे रक्त संकलन करुन रक्तदात्यास रक्ताची गरज भासल्यास अक्षय ब्लड बँकेशी संपर्क साधावा आपणास वेळीच रक्त पुरविले जाईल असे सांगितले.

हा स्त्युत्य असा उपक्रम यशस्वीरित्या व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी संकेत देशमुख,ओंकार बुगड, श्रीशैल्य जंगम,विनायक बुधावले,आकाश बोडरे,आकाश सुरवसे,स्वप्निल बोडरे,जयकुमार माळी,सागर खेडेकर,समाधान खेडेकर,विजय बोडरे,सुरज पिसे,रितेश राजपूत,सुयश पाटील, अथर्व तेली,शिरीष तावरे,बबलू गोंजारी,सागर गोंजारी,राणा घमिरे,ऋषी बाबर,संस्कार जामदार,श्याम जामदार,समर्थ माने, सुहास चव्हाण,अभिजीत बोडरे,दत्ता काळे,अण्णा कदम,महेश बोडरे, ऋषी सावळजकर,मयूर नष्टे,औदुंबर खटावकर,चेतन कोळी,विनायक देशमुख,योगेश देशमुख,वैभव शिकारे,राणासिंग भैस यांनी परिश्रम घेतले.या संयुक्त शिवजन्मोत्सव समितीने अराजकीय व जात-पात हा भेदभाव न ठेवता आठरा पगड जाती धर्मातील तरुणांनी एकत्र येवून कसल्याही प्रकारचे कार्यक्रमाला गाल बोट न लागता महाराजांना अभिवादन केले.हा चर्चेचा व कौतुकाचा विषय बनला आहे.