कै.अमोल पिसे इंग्लिश मिडीयम स्कुलच्या चिमुकल्यांनी भरविला आठवडी बाजार : पालकांचा उदंड प्रतिसाद..!

पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील श्रीमती किसाबाई शंकर सरगर बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचलित कै.अमोल पिसे इंग्लिश मिडीयम स्कुल या शाळेमध्ये काल सोमवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी आठवडी बाजार या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सागर सरगर यांनी केले होते.


शालेय शिक्षण घेत असताना प्रत्यक्ष अनुभवातून व कृतीतून विद्यार्थ्यांना उपयुक्त शिक्षण मिळावे व खर्या कमाईचे व नफा-तोटा याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे हा या उपक्रमाचा हेतू असल्याचे सरगर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
ओsss मामा
या इकडं…इंकडं इंकडं
भाजी घ्या भाजी…!
ताजी ताजी भाजी….!
10 रुपयला एक
सेंद्रिय खत वापरुन पिकवलेली केळी खावा अन् आजाराला ठेवा दूर
ओ मामा…ओ ताई…या इकडं…अशा चिमुकल्यांच्या आवाजाने शाळेचा परिसर दुमदुमून गेला होता.
याचबरोबर लाडू-चिवडा स्टाॅल,चहा स्टाॅल,गरमागरम गुलगुले,बटाटा चिप्स यांसह अनेक पदार्थ व वेगवेगळ्या प्रकारचा भाजी-पाला विद्यार्थ्यांनी बाजारात विक्रीसाठी आणला होता.

बाजारात खरेदी करण्यासाठी पिलीवसह परिसरातील पालकांनी खूप गर्दी केली होती.या प्रसंगी लघु पाटबंधार्याचे सेवा निवृत्त अधिकारी जगन्नाथ जाधव,मुसाखान पठाण,निसार पठाण,बचेरी ग्रा.पं सदस्य विश्वजीत गोरड,सुनिल मदने,अजय वगरे,लक्ष्मण माळी यांसह इतर पालक वर्ग,शिक्षक वर्ग व कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बाजारात विक्रीसाठी आणलेल्या मालाची 100% विक्री झाल्याने चिमुकल्यांचा आनंद द्विगणित झाल्याचे पहावयास मिळाले तर सागर सरगर यांनी या आठवडी बाजाराचे आयोजन केल्याने त्यांचेही पालक वर्गातून कौतुक होत असल्याचे पहावयास मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *