माळशिरस तालुक्यातील दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या बचेरी गावावर तिसऱ्या डोळ्याची करडी नजर : युवा नेते बिराभाई शिंदे यांची संकल्पना व गावकर्यांचा सहभाग..!
पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीव गावापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या व दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या बचेरी गावांमधील सुज्ञान नागरिकांनी युवा नेते बिराभाई शिंदे यांच्या संकल्पनेतून लोकसहभागातून एका दिवसात 50 हजार रुपये गोळा केले.व गावातील चोरी,रोड रोमिओ,भांडण तंटा व इतर काही गोष्टींवर आळा घालण्यासाठी चार सी सी टीव्ही कॅमेरे लावले असून या चार कॅमेऱ्याची कंट्रोल lCD ग्रामपंचायत कार्यालय बचेरी येथे बसविली आहे.सदर कॅमेराचे उद्घाटन पिलीव औट पोस्टचे नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक पुजारी एम.एम यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बचेरी गावचे सरपंच मंगेश पाटील ग्रामपंचायत सदस्य विश्वजीत गोरड,पंडीत मिसाळ हवालदार व देणगीदार आणि बचेरी येथील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.गावाची दुष्काळी भाग म्हणून ओळख असली तरी गावातील सुज्ञान नागरिकांनी गावाच्या सुरक्षेच्या व संरक्षणाच्या दृष्टीकोनातून सी.सी.टीव्ही बसवण्याची संकल्पना बिराभाई शिंदे यांनी योजली आणि ती लोकांनी लोकसहभागातून पूर्ण केली.या स्त्युत्य उपक्रमाने बचेरी येथील देणगीदारांचे सर्वत्र कौतुक होत असून छोट्याशा गावामध्ये सी.सी.टीव्ही कॅमेरे बसवले परंतु पिलीवमध्ये अनेक वर्षापासून सी.सी टिव्हीचा प्रश्न प्रलंबित असल्याची सर्वत्र चर्चा होत आहे.