पिलीव येथील श्रीमती आनंदी काळे यांनी रांगोळीतून साकारली रयतेच्या राजाची हुबेहूब प्रतिमा : गेली दहा वर्षापासून या अखंडीत उपक्रमातूनच करतात महाराजांना अभिवादन…!

पिलीव/सुजित सातपुते
आपल्या राजकीय विरोधकांच्या आईचा,पत्नीचा,मुलांचा,बहिणीचा आदर,सन्मान आणि संरक्षण करण्याचे शिवरायांचे धोरण होते.त्या धोरणाची त्यांनी काटेकोरपणे अंमलबजावणी केली.मोगल इतिहासकार खाफीखान लिहितो, ‘‘जसा भाऊ बहिणीशी वागतो किंवा मुलगा आईशी वागतो तसे शिवाजी महाराज स्त्रियांशी वागायचे.’’ शिवरायांनी नेहमीच धर्मग्रंथ,धार्मिक स्थळे,स्त्रिया आणि लहान मुलांचा सन्मान केला.

आपल्या शत्रू पक्षाच्याही महिलांचा सन्मान करावा,अशी नैतिकता होती. त्यामुळेच त्यांनी स्वराज्यातील व परराज्यांतील महिलांचे संरक्षण केले.परस्त्रीला आपल्या आया-बहिणीसारखी वागणूक देणार्या रयतेच्या राजाला माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील श्रीमती आनंदी गजानन काळे या जिल्हा परिषदेच्या शिक्षिकेने एका अगळ्या-वेगळ्या पध्दतीने अभिवादन केले आहे.मातीच्या कानावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शनिवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी रात्री 9 ते पहाटे 4 वा. पर्यंत जागरण करून साडेचार बाय सात फुट लांबींची 15 ते 16 कलर वापरून आपल्या राहत्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य अशी रांगोळीमध्ये प्रतिमा साकारली असून त्यांनी सदरची रांगोळी पाहण्यासाठी काल दिवसभर आपले घर खुले केले होते.श्रीमती आनंदी काळे या तांदुळवाडी केंद्रातील करांडेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षिका आहेत.त्या सदरचा उपक्रम हा गेली दहा वर्षापासून अखंडीतपणे राबवत असून त्यांच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाला मा.सभापती संग्रामसिंह जहागीरदार,पिलीव येथील नामांकित डॉक्टर दिलीप पवार,तांदुळवाडी येथील केंद्रप्रमुख शैलेजा जाधव,जस्मिन सॉ मिलचे मालक इम्तियाज पठाण,शिक्षक,शिक्षिका यांसह पिलीव परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली.त्यांच्या या नयनरम्य अशा उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.आनंदी काळे यांचा ना कुठला एटीडी कोर्स झाला आहे.ना चित्रकला कोर्स ना पेंटिंग कोर्स तरीही माझ्या मनात रयतेच्या राजाची एक छबी उमटली आहे.आणि तीच छबी मी मनापासून रांगोळीच्या माध्यमातून सातत्यात उतरवली असल्याचे काळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *