पत्रकार सुरक्षा समितीच्यावतीने शशिकांत वारीशे खून प्रकरणी हल्लेखोरांवर कायदेशीर कडक व कठोर कारवाई करण्याची मागणी..!

पिलीव/प्रतिनिधी
वंचित,शोषित,पिडीत व अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी आपली लेखणी पणाला लावणारे निर्भीड पत्रकार म्हणून ओळखले जाणारे राजापूर येथील दैनिक महानगरीचे पत्रकार शशिकांत वारीशे यांची भ्याड हत्या करण्यात आली असून अश्या भ्याड हल्ल्याचा यशवंतराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार सुरक्षा समिती माळशिरस तालुक्याच्यावतीने निषेध व्यक्त करुन वारीशे यांच्या मृत्युस कारणीभूत असणार्या पंढरीनाथ आंबेकर याच्यावर कठोर कारवाई करण्याची मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.

सदरचे निवेदन माळशिरस पोलीस स्टेशनचे स.पो उपनिरीक्षक जरे साहेब यांना देण्यात आले.यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे तालुकाध्यक्ष सुजित सातपुते,पिलीव पत्रकार संघाचे अध्यक्ष रघूनाथ देवकर,जेष्ठ पत्रकार दामोदर लोखंडे,प्रा.संजय पाटील,प्रमोद भैस,शाहरुख मुलाणी,अभिजीत तावरे,गणेश देशमुख,संजय रोकडे,समाधान लोखंडे,विनोद लोखंडे आदि पत्रकारांसह पिलीव औट पोस्टचे अभिजीत कणसे,सतीश धुमाळ व अमित जाधव इत्यादी पोलीस बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *