“शिवनेरीचा चाफा” डॉ.सत्येंद्र चव्हाण यांचा डोळ्यात आंजण घालणारा,अंगावर शहारे आणनारा आणि रक्त सळसळ कळणारा वास्तवादी लेख…!

शिवनेरीच्या प्रत्येक पायरीवर जस जसा चढून जात होतो तसतसे छत्रपतींबद्दलचे विचार सरसर करत पुढे येत होते.परवा सकाळी शिवनेरीला जायचे ठरत होतं फक्त मुलांकडून शिक्कामोर्तब होणं बाकी होतं आंघोळीसाठी जात असता मुलींना विचारलं बाळांनो उद्या शिवनेरीला जायचं का तात्काळ प्रतिसाद मिळाला आणि मन हूरळून गेलं शॉवर खाली उभा झालो आणि कचकन डोळे भरले का ? माहित नाही महाराजांचे नातं कारणीभूत असावं बहुदा तसा मी छत्रपती संभाजीराजांचा अभ्यासक गेली कित्येक वर्ष मी त्यांना अभ्यासतोय लिहितोय त्याच अनुषंगाने डोळे भरले असतील तेही शॉवर खाली असो , छत्रपती शिवरायांचा शिवनेरी इयत्ता चौथी पासून ऐकण्यातला पण प्रत्यक्ष पाहण्याला आयुष्याची 54 वर्षे पूर्ण झाली.कपाळ करंटेपणा 400 ते 450 पायऱ्याचां शिवनेरी.शिवाई देवीचे मंदिर,राजांचा शिवनेरी किल्ल्यांवरती दुर्लक्षित लेणी बुद्धाला हद्दपार केल्याची साक्ष देत होत्या पण बुद्ध मिटला नाही.

कुठल्याही आक्रमणाने तो संपला नाही उलट पक्षी तो जगभर फुलांच्या आणि पालीच्या संगतीने बहरत राहिला चीनच्या प्रवाश्यांनी त्याला अलगद बाहेर काढला.ब्रिटिश संशोधकांनी त्यात अमूल्य योगदान दिलं.अजिंठा दिलं ,वेरूळ दिलं ,आता जुन्नर निघेल.जुन्नर म्हणजे ,जीर्ण ,जीर्ण म्हणजेच प्राचीन आणि प्राचीन तपासताना संशोधकांचाही कस लागेलच जात धर्म प्रांत गोत्र वंश ही मानवाने निर्माण केलेली व्यवस्था तिच्या उतरंडीमुळे अनेक अडगळीत गेलेल्या वैभवांच्या मडक्यांना आता शोधावेच लागेल.पूर्वजांच्या कर्तुत्वाला सलाम करावाच लागेल बाल शिवाजी राजांचे जन्मस्थळ पाहिलं गर्दीतून होणारा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी राजांचा उदघोष अंगावरती रोमांच उभा करत होता.समोर जन्मस्थळ आलं डोळा भरून पाहिलं त्या जागेस वंदन केलं एव्हाना मुलं आणि कुटुंब मागेच राहिलं होतं याचं भान आता झालं.खरंतर बाबासाहेब या महामानवानेच माझी नाळ महाराजांशी जोडली होती “जय भवानी जय शिवाजी ” हा उदघोष सर्वप्रथम बाबासाहेबांच्या वर्तमानपत्रातला तोच उदघोष भीमा कोरेगावच्या ऐतिहासिक समतेच्या युद्धातला देखील याची आठवण झाली.बाबासाहेबांना छत्रपती वंदनीय होते म्हणूनच तर त्यांनी छत्रपती संभाजीराजांवर कोलंबिया विद्यापीठात सर्वात प्रथम प्रबंध लिहिला.छत्रपती शिवाजी महाराजांना रायगडावर वंदन करूनच महाडच पाणी पेटलं मनूला आगीच्या ठिकाणी दिलं आणि समस्त मानव जातीला समतेच्या धाग्यात गुंफलं तर ही माळ तुम्हा आम्हा सर्वांची आंबेडकरी माळ चार वर्षांपूर्वीच हृदयाचा झटका आला होता त्याच्यावरती एन्जोप्लास्टी झाली होती.आज मात्र ती वेदना आणि तो इतिहास विसरून गेलो होतो तुमची मानसिक ताकद ही शारीरिक ताकदीपेक्षा मोठी असते याचे प्रत्यक्ष प्रत्यंतर आलं.शिवनेरीच्या चाफ्यांवर नजर खेळली त्याच्या खोडाची जाडी आणि नागमोडी वळणं पाहून शिवनेरीच्या नागमोडी वळणांची आठवण झाली चाफ्याच्या झाडाभोवती मुद्दामहून फोटो घेतले आठवणींचा चाफा बरोबर घेतला आणि पुन्हा परतीला लागलो पत्नीला हात द्यावा लागत होता.मात्र मुली माझ्यापेक्षा काकणभर सरस निघाल्या. जुन्या वनस्पतींची बॉटनिकल नावं वाचताना मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या पॅरासाईटोलॉजी विषयाची आठवण झाली.समुद्रसपाटीपासून साडेतीन हजार फूट उंचीवरचा शिवनेरी मी डोळा भरून पाहिला ज्या राजाने राजमाता जिजाऊंच्या पोटी इथे जन्म घेतला प्रथम श्वास घेतला त्या राजास हृदयात साठवत शिवनेरी उतरलो सोबत चाफ्यांच्या सुगंधीत आठवणी घेऊनच…!
डॉ.सत्येंद्र चव्हाण
M.VSc(surgery)
पशुधन विकास अधिकारी
औंध,पुणे६७
9975280446

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *