पिलीव येथील शांत,संयमी व कार्यकुशल शिक्षक योगश विलास हावळे यांना नामांकित समजला जणारा सन 2023 चा स.म शंकराव मोहीते-पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान..!

पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील शांत,संयमी,कार्यकुशल व तितकेच प्रामाणिक असे योगेश विलास हावळे (सर) यांना सोलापूर जिल्ह्यामध्ये नामांकित समजला जाणारा सहकार महर्षि शंकराव मोहीते-पाटील 2023 चा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.माळशिरस तालुका प्राथमिक शिक्षक संघ व महिला आघाडी आणि गुरु सेवा शिक्षक परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आज शनिवार दिनांक 21 जानेवारी रोजी अकलुज येथील कृष्णप्रिया मल्टीफंशनल हॉल येथे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास कृ.उ.बा.समितीचे सभापती मदनसिंह मोहीते-पाटील,शिवामृतचे चेअरमन धैर्यशील मोहीते-पाटील,मा.उपसभापती आर्जुनसिंह मोहीते-पाटील,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सल्लागार बाळासाहेब काळे,सोलापूर जिल्हा शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष शिवानंद भरले,सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जेष्ठ नेते उत्तमराव जमदाडे,राज्य उपाध्यक्ष बाबासाहेब धोत्रे,गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख,विस्तार अधिकारी हर्षवर्धन नाचणे सर्व केंद्रप्रमुख,शिक्षक व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.योगेश हावळे यांना हा बहुमान मिळाल्याबद्दल त्यांचा पिलीवसह परिसरातील विवीध संघटनांचे पदाधिकारी व मान्यवर यांच्याकडून सत्कार होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आसल्याचे सोशल मिडीयावर पहावयास मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *