समाजसेवक,जलनायक,युवानेते शिवराज पुकळे यांनी अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक उपक्रमांचे केले आयोजन : पिलीवकरांचा उदंड प्रतिसाद..!
पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे युवानेते जलनायक शिवराज (भाऊसाहेब) पुकळे यांच्या वाढदिवसानिमित्त महारत्न सांस्कृतिक क्रीडा व बहुउद्देशीय संस्था झिंजेवस्ती व त्रिवेणी ज्ञानपीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबीर व शासकीय शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीरामध्ये संपूर्ण शरीर तपासणी व अत्याधुनिक मशीन द्वारे मोफत ई.सी.जी.,मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान, अल्पदरात चष्मे वाटप तसेच रेशनकार्ड नोंदणी व वाटप रेशन संबंधी समस्यांचे निरासण, विधवा महिलांसाठी शासकीय लाभ, घटस्फोटीत महिलांसाठी शासकीय लाभ,दिव्यांगासाठी शासकीय लाभ, श्रावण बाळ सेवा राज्य, इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजन अशा सर्व योजना व आरोग्य शिबीर पार पडले.विविध माध्यमातून या शिबिरामध्ये १०१५ गरजूंनी लाभ घेतला.कार्यक्रामाचे उद्घाटन श्री श्री सदगुरु साखर कारखान्याचे चेअरमन एन.शेषागिरी राव,मा.उपसरपंच आरीफभाई पठान यांच्या हस्ते पार पडले.यावेळी जितेंद्र पाटील, शिवप्रसाद पुकळे, दादासाहेब वगरे,सचिन भैस, पठाण वस्तीचे सरपंच एजाज पठाण,चांदापुरीचे पार्टी प्रमुख विजय पाटील,शिंगोर्णी सरपंच अक्षय धांडोरे,बचेरी सरपंच महादेव पाटील,बिरा शिंदे, कल्याण जावळे ,कुमार भैस, अविनाश जेऊरकर ,माळशिरस पुरवठा विभाग जरग साहेब, झंजे साहेब, लहू पाटील, नितीन कपने ,जीवन गुरव, राजाभाऊ जामदार, गोविंद भैस, अशोक बगाडे ,नाथा सोलंकर, महादेव सुळे,अधिकराव माने, बाजीराव सुळे, पिलीव पत्रकार संघ व मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विक्रम सुळे,अक्षय वगरे, गणेश देशमुख, विश्वजीत गोरड, गणेश घुले,राम गलांडे,सुमित मोरे,संघर्ष पुकळे, राहुल लोखंडे, मकरंद कोपनर,ऋषिकेश देशमुख, आबासाहेब माने यांचे मोलाचे सहकार्य लाभले.