पिलीवच्या यंगस्टार बॉईजने केली तांदुळवाडीच्या एस.नाना ग्रुपवर 8 धावांनी मात :यंगस्टार बॉईज ठरले प्रथम बक्षिसाचे मानकरी..!

पिलीव/सुजित सातपुते
आज रविवार दिनांक 22 जानेवारी 2023 रोजी माळशिरस तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्रीराज भैय्या माने-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल अकलूज येथे वीरविजय क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य हाफपिच आमंत्रित वन डे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सदरच्या स्पर्धेमध्ये प्रथम बक्षिस 7000,द्वितीय बक्षिस 5000,तृतीय बक्षिस 3000 तर चतुर्थ बक्षिस 3000 या प्रमाणे होते.यामध्ये फाईनलचा सामना एस.नाना क्रिकेट क्लब तांदुळवाडी विरुध्द यंगस्टार बॉईज क्रिकेट क्लब पिलीव यांचा सामाना रंगला होता.या फाईनलच्या सामन्यामन्यामध्ये यंगस्टार बॉईजने एस.नाना ग्रुपला 85 धावांवर गुंडाळून 8 धावांनी विजय खेचुन आणला व रोख रक्कम 7000 रुपये,प्रमाण पत्र व तब्बल 3.5 फुटाची ट्रॉफी अशा स्वरुपाच्या प्रथम बक्षिसाचे माणकरी ठरले.यंगस्टार बॉईजने या अगोदरही माळशिरस तालुक्यासह इतर तालुक्यातही पिलीव गावचे नाव झळकविल्याने आज सर्व खेळाडूंचा संग्रामराजे प्रतिष्ठानतर्फे सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.आजचा विजय खेचून आणन्यासाठी टिममधील सर्वच खेळाडूंनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *