कै.अमोल पिसे इंग्लिश मिडीयम स्कूलमधील चिमुकल्यांच्या नृत्यांना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद : रसिकांची दाद अन् चिमुकल्यांची खैरात..!
पिलीव/प्रतिनीधी
विविध गीतांवर थिरकणारे चिमुकले कलाकार, त्यांचे गोंडस, लोभस व गोजीरवाणे हावभाव, वय अंत्यंत कमी असले तरी गाण्याच्या कडव्यांबरोबर नृत्याची चाल बदलणाऱ्या लहान मुलांच्या नृत्य-गीतांना उपस्थित प्रेक्षकांनी भरभरून दिलेली साथ पाहताना शिक्षकांनी घेतलेली मेहनतही लक्षात येत होती.

पिलीवच्या बादशाही रंगमंचावर काल 2023 च्या वार्षिक स्नेह संमेलनास सुरूवात झाली आणि लहान मुलांमध्ये दडलेले कलाकार अनुभवायला मिळाले.पिलीव ता. माळशिरस येथील श्रीमती कीसाबाई शंकर सरगर बहु.सामाजिक संस्था संचलित कै.अमोल पिसे इंग्लिश मिडीयम स्कुलच्या 2023 या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.या महोत्सवाचे उद्घाटन माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय आमदार राम सातपुते,कृषी व पशु संवर्धनचे माजी सभापती संग्रामसिंह जहागीरदार यांच्या शुभाहस्ते करण्यात आले.यावेळी जि.प सदस्य गणेश पाटील,पं.स सदस्या ताई महाडिक,पिलीवचे लोकनियुक्त सरपंच नितीन मोहीते,मल्लसम्राट रावसाहेब मगर,शिक्षणाधिकारी तानाजीराव घाडगे,डॉ.उत्तमराव सरगर,जेष्ठ पत्रकार दामोदर लोखंडे,विश्वजीत गोरड,विकास कोकरे,बिराभाई शिंदे,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद व मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.यावेळी सुत्रसंचालन करताना सागर कुंभार सर नृत्य सादर करणार्या चिमुकल्यांना आपल्या अँकरींगमधून प्रोत्साहन देत होते.

यावेळी आमदार राम सातपुते यांनी शाळेला भविष्यात कसलीही मदत लागूद्या मी सदैव तत्पर राहीन असे सांगितले तर संग्रामसिंह जहागीरदार यांनी स्पर्धा, महोत्सव किंवा गॅदरिंग काही असो,पालकांनी आपल्या मुलांना त्यामध्ये सहभागी व्हायला लावले पाहिजे.कारण यामुळे मुलांचा बौध्दिक व मानसिक विकास होतो. त्यांच्यातील न्युनगंड नाहिसा होऊन ते कोणत्याही कठिण आव्हानाला तयार होतात असे सांगितले.संस्थेचे सर्वेसर्वा सागर सरगर सर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनानुसार कार्यक्रम यशस्वी झाला.त्यानुसार बाल व कुमार वयातील कलाकारांनी विविध लोकगीत,सिनेगीत, आदिवासी गीत सादर करून ‘हम भी कुछ कम नही’ हे सिध्द करुन दाखविले.

आपल्या मुलांचा नृत्याविष्कार पाहताना पालकांची मने आनंदाने उचंबळून येत होती.त्यांच्या प्रत्येक गीतांना प्रेक्षक टाळ्यांच्या कडकडाटात साथ देत होते. अगदीच निरागस असणाऱ्या या लहान मुलांना नृत्याच्या चाली शिकवणाऱ्या शिक्षकांचेही व संस्थापक अध्यक्ष सागर सरगर यांचे पालक वर्गातून कौतूक होत असून सागर सरगर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असल्याचे पहावयास मिळत आहे.