प्रत्येक क्षेत्रात अव्वल असणार्या शर्वरीचे शासकीय रेखाकला ग्रेड परीक्षेत उत्कृष्ठ यश..!
पिलीव/प्रतिनीधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयची इयत्ता 8 वी मध्ये शिकणारी कु.शर्वरी विजय बंगाळे या विद्यार्थिनीने शासकिय रेखाकला ग्रेड परीक्षेत ( एलिमेंटरी ) मध्ये A श्रेणी मिळवून आपल्या गावाचे व शाळेचे नाव गुणवत्ता यादीमध्ये झळकविले आहे.विद्यालयातून A श्रेणी मिळवणारी एकमेव विद्यार्थीनी असल्यामुळे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री .कापसे सर,विभाग प्रमुख श्रीमती.आठरे मॅडम व श्री झाडे सर,पर्यवेक्षिका,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद,स्थानिक स्कुल कमिटी सदस्य,ग्रामस्थ यांनी शर्वरीचे सत्कार करुन अभिनंदन व कौतुक केले.