पिलीवच्या बाजारपेठेत दोनशे रुपयांच्या नकली नोटांचा शिरकाव : सुप्रसिद्ध अशा हॉटेलमध्ये दिली नकली दोनशे रुपयांची नोट,चाहूल लागताच भामट्यांनी काढला पळ…!
पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील बाजारपेठेत दोनशे रुपयांच्या नकली नोटांचा शिरकाव झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
सदर प्रकरणाची सविस्तर माहीत अशी कि पिलीव येथील श्री स्वामी समर्थ हॉटेलचे मालक प्रवीण उर्फ मुन्ना आर्वे यांच्या हॉटेलमध्ये दोन मुलांनी चहा पिऊन नकली दोनशे रुपयाची नोट देऊन उरलेले पैसे माघारी घेतले व संबंधित हॉटेल मालकाच्या लक्षात येण्याअगोदरच अज्ञातांनी तेथून पळ काढला. थोड्यावेळाने आर्वे यांच्या 200 रुपयेची नकली नोट असल्याचे लक्षात येताच अज्ञात भुरटे तेथून निघून गेल्याचे दिसले.याबाबतची चर्चा पिलीव बाजारपेठेत पसरताच आपली ही फसवणूक होऊ नये.हे दुकानदारांच्या लक्षात आली असून मुख्य बाजारपेठेतील अनेक व्यापाऱ्यांना सदरचा हा भामटा आपल्यालाही फसवू शकतो.बनावट नोटांचा प्रकार काहींच्या लक्षात येताच त्यांनी सावधगिरी बाळगल्याचे दिसून येत आहे.पिलीव बाजारपेठेतील अनेक व्यापाऱ्यांना दुकानदारांना हॉटेलधारकांना बनावट नोटा देऊन अज्ञाताने फसवले कि नाही.हे माळशिरस टाईम्सच्या माध्यमातून चाचपणी चालू आहे.परंतु आशा फसवणूकीबाबत पिलीव औट पोस्टला अद्यापतरी कोणीही तक्रार दिली नाही.