पठाणवस्तीचे लोकनियुक्त सरपंच एजाज पठाण यांना मातृशोक..!
पिलीव/प्रतिनीधी
माळशिरस तालुक्यातील पठाणवस्तीचे लोकनियुक्त सरपंच एजाज फैजखान पठाण यांच्या आई नजीराबी फैजाखान पठाण (वय-65) यांचे आज पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले आहे.त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी 9:00 वाजण्याच्या सुमारास पठाणवस्ती येथे होणार आहे.नजीराबी यांचा गोड व मनमिळावू स्वभाव असल्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी कळताच पठाणवस्तीसह परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात पती फैजखान दोन मुले तीन मुली व नातवंडे असा परिवार आहे.