पिलीवमधील प्रत्येक पत्रकारांनी आपल्या निस्वार्थी पत्रकारीतेच्या माध्यमातून गोर-गरीब व गरजू लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा – संग्रामसिंह जहागीरदार..!

पिलीव/सुजित सातपुते
प्रत्येक वर्तमानपत्राचा किंवा न्यूज चैनलचा पत्रकार हा नि:पक्षपाती आसावा,पत्रकारांनी राजकारण न करता निस्वार्थीपणे समाजकारण करत राहावे.आपणाला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून संबोधले जाते त्यापरीने निस्वार्थीपणे समाजातील गोरगरिबांच्या अडचणी व समस्या जाणून घेऊन त्या समस्या आपल्या बातमीदारीतून शासनदरबारी मांडाव्यात,गरीब व गरजू लोकांपर्यंत शासकीय योजनेंचा लाभ कसा पोहोचेल,एखाद्यावर अन्याय झाला तर त्याला वाच कशी फोडता येईल व आपल्या पत्रकारीतेच्या माध्यमातून त्या पिडीताला कसा न्याय मिळवून देता येईल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच पत्रकारिता करावी.

एखाद्या वादग्रस्त प्रकरणाची लगेच बातमी न लावता सदर प्रकरणाची शहानिशा करूनच बातमी लावावी म्हणजे आपलीही बाजू सेफ राहील याची काळजी घ्यावी.व पिलीव पत्रकार संघातील सर्व सभासदांनी आपल्या मध्ये एकोपा ठेवून काम करत राहवे.असे सांगून कृषी व पशु संवर्धनचे माजी सभापती संग्रामसिंह जहागीरदार यांनी सर्व पत्रकार बांधवान सन्मान करुन पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.पत्रकार दिनाचे औचित्य साधून संग्रामराजे प्रतिष्ठान तर्फे आयोजित केलेल्या पिलीव पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या व सभासदांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी पिलीवचे सरपंच नितीन मोहीते-माळी,भाजपा चे शहराध्यक्ष राजेंद्र करांडे,ग्रा.पं सदस्य आविनाश जेऊरकर,सौ.सुष्माताई जामदार,रणधीरसिंग जामदार ॲड.वैभव मेथवडे,समशेरसिंग राजपूत,नानासाहेब मदने,तानाजी लोखंडे,मोहसीन शेख,नवनाथ पिसे यांसह पिलीव पत्रकार संघाचे पदाधिकारी व सर्व सभासद उपस्थित होते.यावेळी राज्यस्तरीय कूस्ती स्पर्धेत 86 किलो वजन गटात दुसरा क्रमांक पटकविल्याबद्दल पिलीव येथिल चि.प्रणित नागेश सरवदे याचा ही सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *