उद्या करमाळा येथे डॉ.श्रीकांत शिंदे डायलायसिस सेंटरचा भव्य उद्घाटन सोहळा : उद्यापासून करमाळा व परिसरातील रुग्णांची होत असलेली हेळसांड थांबणार..!

पिलीव/सुजित सातपुते
महाराष्ट्र राज्याचे संवेदनशिल मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रस्तावित स्वतंत्र सैनिक मनोहरपंत चिवटे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि ॲपेक्स किडणी केअर सेंटर,मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या रविवार दि. ३० ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ६:००वाजता करमाळा येथे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे डायलायसिस सेंटरचा भव्य असा उद्घाटन सोहळा होणार आहे.या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख आदरणीय मंगेशजी चिवटे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे.असे आवहन शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेशजी चिवटे व सीईओ दीपक पाटणे यांनी केले आहे.

करमाळा शहर तालुक्यातील रुग्णांसाठी डायलायसिस सेंटर ही अत्यावश्यक सेवा होती.ही सेवा मिळत नसल्यामुळे रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत होते.मात्र आता या सुविधेमुळे करमाळ्यातच ही सेवा उपलब्ध होणार असल्यामुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे. यापूर्वीच करमाळा येथे श्री कमला भवानी ब्लड बँक उभारणी करून रक्ताची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.या कार्यक्रमासाठी खासदार सुजय विखे-पाटील,खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर,आमदार गोपीचंद पडळकर,शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत,आ.शहाजी बापू पाटील,आ. संजयमामा शिंदे,आमदार सचिन कल्याणशेट्टी,माजी आमदार नारायण पाटील,जयंतराव जगताप,रश्मीदीदी बागल,नगरसेवक धनंजय जाधव,उद्योजक मितेशजी शहा यांच्यासह अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती महेशजी चिवटे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *