शुभजीत सोमनाथ नष्टे यांची जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता या पदावर नियुक्ती..!

पिलीव/प्रतिनीधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील नामांकित आशा वीरशैव लिंगायत समाज संघटनेचे अध्यक्ष तथा पिलीव पत्रकार संघाचे अध्यक्ष चि.शुभजित सोमनाथ नष्टे यांची जिल्हा परिषद बांधकाम विभाग सांगोला येथे कनिष्ट अभियंता (Jr.Enng) या पदावर नियुक्ती झाली असून कालपासून ते सांगोला येथे कनिष्ठ अभियंता या पदावर रुजू झाले आहेत.नष्टे यांच्या निवडीबद्दल पिलीव पत्रकार संघ,वीरशैव लिंगायत समाज व विविध संघटनेचे पदाधिकारी यांच्याकडून नष्टे यांचा शाल,श्रीफळ व पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला.यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती संग्रामसिंह जहागीरदार यांनी शुभजित नष्टे यांना राजवाड्यामध्ये बोलावून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या सदरच्या निवडीमुळे नष्टे यांच्या मित्र परिवारामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असल्याचे पहावयास मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *