पोनि दिपरतन गायकवाड व सपोनि शशिकांत शेळके यांची दमदार कामगिरी : डाळींबीच्या बागेत गांजाची लागवड,मारला छापा केली अटक..!

पिलीव/प्रतिनीधी
पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड माळशिरस पोलीस ठाणे यांना गोपनीय बातमी मिळाली की, मौजे डोंबाळवाडी येथील एका इसमाच्या शेतामध्ये गांज्याच्या झाडाची लागवड करण्यात आलेली आहे. सदर मिळालेल्या बातमीच्या अनुशंगाने मा. पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी मा. पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते मॅडम सो सोलापुर ग्रामीण, मा. अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव सो तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे सो अकलुज विभाग अकलुज यांचे मार्गदर्शना खाली पो. नि. दिपरतन गायकवाड यांचे सह सपोनि / शशिकांत शेळके, पोसई/पुजारी, सपोफी/हनुमंत जरे, पोहेकॉ/ घोगरे, पोहेकॉ/ नवनाथ सोनटक्के, पोना/स्वप्नील गायकवाड पोना/ राहुल रुपनवर, पोकों/सोमनाथ माने, चापोकों/ माने यांचे पथकाने मौजे डोंबाळवाडी ता.माळशिरस येथील इसम नामे गणपत शिवाजी जाधव रा. डोंबाळवाडी, खुडुस ता माळशिरस जि सोलापुर यांचे शेतातील डाळिंबाचे बागेमध्ये छापा मारुन कारवाई केली असता. सदर कारवाई मध्ये हिरवा पाला, बोंडे, फांदया, खोड, मुळे असलेली गांजाची हिरवी ओली 06 झाडे त्याचे एकुण वजन 6 किलो 469 ग्रम व त्याची एकुण किमांत 97035/- असा असलेला मुद्देमाल मिळुन आली असुन. सदर छाप्याची कायदेशीर कारवाई पुर्ण करुन सदर ठिकाणी मिळुन आलेल्या गांज्याच्या झाडाबाबत. माळशिरस पोलीस ठाणे येथे गुरनं 478 /2022 गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनो व्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनीयम (एन.डी.पी.एस. कायदा ) कलम 8 (सी) 20 (बी). 22 प्रमाणे पोलीस ठाणे कडील सपोफो/ हनुमंत दत्तात्रय जरे नेमणुक माळशिरस पोलीस ठाणे यांनी दिलेल्या फिर्याद वरुन सदरचा गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला असुन त्यामध्ये इसम नामे गणपत शिवाजी जाधव वय 72 वर्षे रा. डोंबाळवाडी खुडुस ता माळशिरस जि सोलापुर यांना अटक करण्यता आली असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास हे माळशिरस पोलीस ठाणे कडील सपोनि घोळकर साहेब करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *