पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिलीव येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन

पिलीव/प्रतिनीधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी मुख्यद्यापक श्री.कापसे एस.डी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती हिरके मॕडम यांनी रांगोळी स्पर्धेचे आयोजन आले होते.

त्यामध्ये विद्यालयातील 42 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाहोता.बेटी बचाओ बेटी पढाओ,कमवा आणि शिका,झाडे लावा झाडे जगवा,शेतकऱ्यांची व्यथा,अनेकता में एकता,पाणी आडवा पाणी जिरवा,कर्मवीर आण्णा ,प्रदूषण थांबवा पृथ्वी वाचवा,स्त्रीभ्रूण हत्या अशा विविध विषयांवर विद्यार्थिनींनी सुंदर आकर्षक रांगोळी काढल्या होत्या.स्पर्धेसाठी मुख्याध्यापक श्री कापसे सर पर्यवेक्षक श्री पाटील सर विभाग प्रमुख श्रीमती हिरके मॅडम उपस्थित होते.रांगोळी स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री ढोले सर,श्री ठाकर सर,श्रीमती लिंगे मॅडम यांनी परिक्षण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *