पिलीव येथील अनिल कोल्हटकर यांना 2022 चा सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान..!

पिलीव/सुजित सातपुते
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गारवड तालुका माळशिरस या शाळेचे इंग्रजी विषयाचे शिक्षक व पिलीव गावचे सुपुत्र श्री.अनिल ज्ञानदेव कोल्हटकर यांना शैक्षणिक,सामाजिक,आध्यात्मिक,कला,क्रीडा,साहित्य,सांस्कृतिक,धार्मिक आदि क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील आदर्श शिक्षक 2022 चा पुरस्कार जय-विजय शिक्षक पतसंस्था अकलूज यांच्यावतीने प्रदान करण्यात आला.अंधश्रद्धा निर्मूलन,बालविवाह प्रतिबंध,संपूर्ण साक्षरता अभियान,स्वच्छ भारत अभियान,वृक्षारोपण वृक्ष संगोपन अशा वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये त्यांनी आपल्या कार्यकौशल्यातून एक विशेष उल्लेखनीय असा उल्लेखनीय ठसा उमटवला आहे.व याच कामाची पोहच पावती म्हणून त्यांना 2022 या चालू वर्षाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला असल्याचे कोल्हटकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.सुप्रसिद्ध व्याख्याते,सूत्रसंचालक,कलाकार,चित्रकला,सुंदर हस्ताक्षर प्रकल्प कला-क्रीडा,शारीरिक शिक्षण,शिष्यवृत्ती मार्गदर्शन व शैक्षणिक कार्य हे सर्व पाहूनच सदर संस्थेने माझी पुरस्कर्ता म्हणून निवड केली असल्याचे त्यांनी सांगितले.पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल पिलीवसह परिसरातील सामाजिक,शैक्षणिक,राजकीय व इतर विविध संघटनेच्या पदाधिकारी यांच्याकडून अनिल कोल्हटकर यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *