मराठी समाजसुधारक,शिक्षण प्रसारक,रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक,शिक्षण महर्षी डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त पिलीव येथे भव्य मिरवणूक..!

पिलीव/प्रतिनीधी
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक ज्यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून 19 व्या शतकात शिक्षणाची ज्ञानगंगा गोरगरिबांच्या,दिन-दलितांच्या सर्वसामान्य,गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत पोहोचवून बहुजनांच्या मुला मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले.व त्यांना वेगवेगळ्या पदावर अधिकारी शासनकर्ते होण्याची संधी व कार्य करण्याची संधी उपलब्ध करून दिली.अशा या थोर समाजसेवक व शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त पिलीव येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व रमेश खलीपे जुनिअर कॉलेजच्यावतीने डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या भव्यप्रतिमेची सजवलेल्या रथातून पिलीवच्या मुख्य पेठेतून वाजत गाजत ढोल ताशा,लेझीम पथक,झांज पथक इत्यादी पारंपारिक वाद्याच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली.यावेळी वेगवेगळ्या महामानवांची, पदाधिकाऱ्यांची,नेत्यांची शिक्षण तज्ञांची वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी कर्मवीर अण्णांच्या कार्याचा जयघोष व जय-जय कार करीत विद्यार्थ्यांनी परिधान केलेल्या वेशभूषा व वृक्षाचे महत्व सांगणारे डोकीवक्षर घेतलेल्या तुळशी वृंदावन यांसह सहभागी झालेल्या मुली नागरिकांचे लक्ष आकर्षित करित होते.विद्यार्थ्या समवेत शांततेच्या वातावरणात भव्य प्रमाणात विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी खेळाचे सादरीकरण करीत भव्यप्रमाणात मिरवणूक काढण्यात आली.प्रारंभी विद्यालयाचे प्राचार्य एस.डी कापसे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.यावेळी जेष्ठ शिक्षिका सौ.कल्पना सातपुते सांस्कृतिक विभागाचे शिक्षक सत्यवान वाघमारे व वेशभूषा धारक विद्यार्थ्यांच्या शुभहस्ते मिरवणुकीला शुभारंभ करण्यात आला.जयंतीची मिरवणूक शांततेच्या वातावरणात विद्यालयाचे प्राचार्य एस.डी कापसे प्रभारी परिवेक्षक विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्व शिक्षक शिक्षेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या सहभागाने सर्वांनी परिश्रम घेऊन शांततेच्या वातावरणात पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *