महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराजे देसाई यांची पिलीव येथील अक्षय हॅास्पिटला सदिच्छा भेट…!
पिलीव/प्रतिनीधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे सोलापूर-सातारा हायवेवर अनेक वर्षापासून पिलीवसह परिसरातील वाड्या-वस्तीवरील लोकांना अगदी माफक दरात उच्च प्रतिची रुग्णसेवा देणारे डॉ.मिलींद गुळभिले यांचे अक्षय हॉस्पिटल कार्यरत असून गेल्या काही दिवसांपासून त्यांचा मुलगा डॉ.तुषार गुळभिले व सून डॉ.सायना गुळभिले यांनी उच्च शिक्षण घेवून या अक्षय हॉस्पिटलचे सर्जिकल ॲन्ड मॕटर्निटी होममध्ये रुपांतर केले आहे.त्यामुळे युरोसर्जरी,स्त्री रोग,जनरल सर्जरी,दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया यां व अशा अनेक सुख सुविधा अक्षय हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाल्या आहेत.त्यामुळे परिसरातील रुग्णांची ये-जा चालू असते आणि त्यातच आज मंगळवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी अचानक एक भली मोठी फोर्डची गाडी त्या गाडीच्या पूढे-मागे लाल दिव्यांच्या गाड्यांचा ताफा अक्षय हॅास्पिटल समोर थांबला व पिलीव बसस्थानक परिसरामध्ये एकच खळबळ उडाली की इतके पोलीस आणि इतक्या गाड्या काय झालय अन् कोण आलय तर तो ताफा होता.महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आदरणीय श्री नामदार शंभुराजे देसाई यांचा शंभुराजे व डॉ.गुळभिले यांची जुनी मैत्री असल्याने मंत्री महोदयांनी दौर्याच्या नियोजनामध्ये भेटीचा कार्यक्रम नसतानाही अक्षय हॅास्पिटला सदिच्छ भेट देण्याचे ठरविले आणि हॉस्पिटल समोर आपला ताफा थांबविला
यावेळी त्यांच्या सोबत आटपाडी तालुक्याचे आमदार अनिलभाऊ बाबरही उपस्थित होते.गुळभिले परिवाराच्या विनंतीला मान देवून शंभूराजे व बाबर यांनी अल्पोहार घेतला व त्यांना शाल श्रीफळ देवून डॉ.गुळभिले यांनी त्यांच्या सत्कार केला.यावेळी हॉस्पिटलची सुख-सुविधा व स्वच्छता पाहून डॉ.मिलींद गुळभिले व डॉ.तुषार गुळभिले यांचे शंभुराजे यांनी कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.