सांगली जिल्ह्यातील तासगाव या गावात साकारले हुबेहूब केदारनाथ मंदिर : सौरभ ताड या युवकाने साकारली केदारनाथ ची प्रतिकृती..!


पिलीव/अजित करडे
गणेश उत्सव हा सण जवळ आला की प्रत्येक जण आपआपल्या घरी गणपती बाप्पांचे सजावटीची तयारी करतात.तसेच तासगाव या गावांमध्ये सौरभ ताड या युवकाने त्याच्या घरी साकारले हुबेहूब केदारनाथ मंदिर केदारनाथ मंदिराची प्रतिकृती.

ही प्रतिकृती देतेय प्रत्यक्षात केदारनाथ चा अनुभव हा देखावा सादर करण्यासाठी त्याला पंधरा- ते वीस दिवसाचा कालावधी लागलेला आहे.. त्या युवकाने हे केदारनाथ मंदिर पुठ्ठ्यापासून बनवले आहे.तसेच त्याच्या समोर असणारी छोटी छोटी घरे हे देखील त्यांनी पुठ्यापासून तयार केलेले आहे.आणि मागच्या बाजूस जे हिमालय पर्वत आहे ते पोत्यापासून बनवलेले आहे. त्यामध्ये माती चुना यांचे मिश्रण करून त्याला योग्य तो पर्वतांचा आकार देण्यात आलेला आहे.तसेच त्यामध्ये वॉटर कलर वापरून योग्य ते रंग काम करण्यात आलेलं आहे. तसेच मागच्या बाजूस भिंतीवरील जे भगवान शंकरांचे जे छायाचित्र आहे.

जे की भगवान शंकर हिमालय पर्वता मध्ये ध्यानास्त बसलेले आहेत असं दाखवण्यात आलेला आहे. ते छायाचित्र स्वतः प्रिंट करून लावण्यात आलेले आहे.. आणि तसेच मंदिराच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या नद्या म्हणजेच मंदाकिनी नदी आणि सरस्वती नदी यांचा देखील संगम योग्य प्रकारे दाखवण्यात आलेला आहे. अशाप्रकारे हा देखावा खूप बारकाई पणे टिपण्यात आलेला आहे.त्यामुळे तासगाव सांगलीसह संपुर्ण महाराष्ट्रभर सोशल मिडीयातुन सौरभ ताड या तरुणावर अभिनंदनाचा वर्षाव होत असल्याचे पहावयास मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *